बिहारमधील बांका जिल्ह्यातील अमरपूरमधील एका 60 वर्षीय आजीने 35 वर्षीय तरुणासाेबत पळून जाऊन लग्न केले, ज्यामुळे माेठी खळबळ उडाली आहे. मुलेनातवंडे यांचे माेठे कुटुंब असलेल्या अमरपूर गावातील आजी आणि तिचा तरुण प्रियकर गुप्तपणे घरातून पळून बस स्थानकावर पाेहाेचले. कुटुंबाला हे कळले. म्हणून आजीचा वृद्ध नवरा आणि मुलगा तिच्या मागे धावले आणि त्या तरुणाला निर्दयीपणे मारहाण करू लागले.ही घटना पाहण्यासाठी गर्दी झाली; पण आजीने तरुण प्रियकराला मारहाणीपासून वाचवताना उघड केले की आम्ही एकमेकांवर प्रेम करताे आणि लग्न करण्याचा निर्णय अटळ आहे.या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात एका साध्या राॅन्ग नंबरने झाली हाेती. सुमारे 4 महिन्यांपूर्वी या महिलेच्या फाेनवर आरा येथील रहिवासी वकील मिश्रा याचा फाेन आला.
फाेनवर सुरू झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले.हे प्रेम प्रकरण इतकं वाढलं की दाेघांनीही घरादाराचा विचार साेडून एकत्र येण्याचा निर्णय घेतला.ते दाेघे गुपचूप भागलपूर रेल्वे स्टेशनवर भेटले आणि तिथून थेट लुधियानाला पळून गेले.
महिलेने पाेलिसांना सांगितले की, त्यांनी तिथे लग्न केले असून ते आता पती-पत्नी म्हणून राहत आहेत.एकीकडे महिला आपल्या प्रेमावर ठाम असली, तरी तिच्या पतीला आणि मुलांना हे स्वीकारणे कठीण जात आहे. आपल्या आईने आणि पत्नीने अशा प्रकारे वयाने लहान असलेल्या व्यक्तीशी नाते जाेडल्यामुळे कुटुंबाचे रडून हाल झाले आहेत. संतप्त नातेवाईकांपासून वाचवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी या प्रेमी युगुलाला पाेलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणातील सर्व कायदेशीर बाजू तपासून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पाेलिसांनी स्पष्ट केले आहे.