जपान शिष्टमंडळाची पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा

    10-Feb-2026
Total Views |
 
 

japan 
राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल; तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची जपानमधील सागा प्रांताचे गव्हर्नर व उच्चस्तरीय शिष्टमंडळाने भेट घेऊन पर्यावरण, प्लॅस्टिकमु्नती, शिक्षण, दुग्धव्यवसाय आदी विषयांवर सविस्तर चर्चा केली.नदी पुनरुज्जीवन आणि प्लॅस्टिकमु्नत जलस्राेत हा राज्याचा प्राधान्यक्रम असून, यासाठी जपानचे सहकार्य माेलाचे ठरेल, असा विश्वास मुंडे यांनी व्य्नत केला.समुद्रातील व नदीतील प्रदूषण राेखणे, प्लॅस्टिकमु्नतीसाठी संयु्नत प्रयत्न करणे; तसेच शिक्षण, पशुसंवर्धन आणि साैंदर्यप्रसाधन उद्याेग क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबतही यावेळी सकारात्मक चर्चा झाली.मुंडे यांच्या शासकीय निवास्थानी झालेल्या या बैठकीत सागा प्रांताचे गव्हर्नर याेशिनाेरी यामागुची, प्रादेशिक देवाणघेवाण विभागाचे उपमहासंचालक मसाहिराे ओनाे, आंतरराष्ट्रीय धाेरण गटाचे उपसंचालक काेजी याेशिताके, प्रकल्प प्रमुख काेकी कनामारू आणि जेट्राे सागाचे मुख्य संचालक हिराेशी याेनेयामा, राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डाॅ. एन.रामास्वामी, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भाेज, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव देवेंद्र सिंह आदी सहभागी झाले हाेते.प्लॅस्टिक व्यवस्थापनासाठी उभारण्यात येणाऱ्या वर्ल्ड ओशन प्लॅस्टिक प्लॅनिंग सेंटर या केंद्राला भेट देण्याचे निमंत्रण यामागुची यांनी मुंडे यांना दिले.