मुंबई-बंगळुरू महामार्गाच्या कामात वीजवाहिन्यांचे नुकसान

प्राधिकरणाच्या कामावर महावितरणचा आक्षेप : पोलिसांत तक्रार दाखल

    04-Nov-2026
Total Views |

Veej 
पुणे, 3 नाेव्हेंबर (आ.प्र.):
वाकड ब्रीज ते चांदणी चाैकादरम्यान मुंबई-बंगळुरू महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामात महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या कामादरम्यान 16, 17 आणि 31 ऑक्टाेबरला वीजवाहिन्यांचे नुकसान झाल्याने महावितरणला आर्थिक फटक्याबराेबरच ग्राहकांना नाहक अंधारात राहावे लागले.
 
वारंवार सूचना देऊनही वीजवाहिन्यांचे सुरक्षित स्थलांतर करण्यापूर्वी काम सुरू ठेवल्याचा आक्षेप महावितरणने घेतला आहे. या प्रकरणी संबंधित कंत्राटदाराविराेधात बावधन पाेलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
 
महामार्गाच्या रुंदीकरणासह सेवा रस्त्याच्या कामात अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिन्यांचे नियमानुसार स्थलांतर करणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणेने महावितरणकडून अंदाजपत्रक मंजूर करून घेऊन आवश्यक कार्यवाही करणे अपेक्षित आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) मंजुरी घेतली आहे; मात्र पुणे महापालिका हद्दीतील कामासाठी अशी परवानगी घेतलेली नसल्याचे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पूर्वसूचना देऊनही काम सुरू ठेवल्याने वीजवाहिन्यांचे नुकसान हाेत असून, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर ग्राहकांच्या राेषाला महावितरणला सामाेरे जावे लागत आहे.
 
महामार्गाच्या कामादरम्यान 16 ऑक्टाेबरला 22 केव्ही बेव्हर्ली फिडरची केबल ताेडण्यात आली. 17 ऑक्टाेबरला बिटवाइज चाैक परिसरात 22 केव्ही निया फिडरच्या केबलचे नुकसान झाले. 31 ऑक्टाेबरलाही केबल नादुरुस्त झाल्याची घटना घडली. वारंवार हाेणाऱ्या या प्रकारांमुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवताना महावितरणला अडचणींचा सामना करावा लागत आहे. केबल दुरुस्ती आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी लाखाे रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
 
याशिवाय वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्राहकांची गैरसाेय हाेत असून, महावितरणच्या महसुलावरही परिणाम हाेत आहे. या मार्गावरील 22 केव्ही उच्चदाब आणि लघुदाब भूमिगत वीजवाहिन्यांचे याेग्य नियाेजन न करता रस्त्याचे काम पूर्ण केल्यास भविष्यात गंभीर अडचणी निर्माण हाेऊ शकतात. या वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यास औंध, बाणेर आणि महाळुंगे परिसरातील माेठ्या संख्येने ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्याचे काम करण्यापूर्वी वीजवाहिन्यांची जागा निश्चित करून त्यांचे सुरक्षित स्थलांतर करणे आवश्यक असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या वीजवाहिन्या रुंदीकरणानंतर रस्त्याच्या मधाेमध येण्याची किंवा काँक्रीटखाली गाडल्या जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत केबलमध्ये बिघाड झाल्यास दाेष शाेधणे आणि दुरुस्ती करणे कठीण हाेईल. त्यासाठी काँक्रीटचा रस्ता खाेदण्याची वेळ आल्यास दुरुस्तीला विलंब हाेऊन लाखाे ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित हाेऊ शकताे. महामार्गासारखी महत्त्वाची पायाभूत सुविधा उभारताना वीजपुरवठ्यासारख्या अत्यावश्यक सुविधेचे नुकसान हाेणार नाही, याची खबरदारी घेऊनच काम करावे, अशी महावितरणची भूमिका आहे. महावितरणच्या औंध उपविभागांतर्गत बाणेर शाखा कार्यालयाने 27 ऑक्टाेबरला बावधन पाेलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे.