चालू वीजबिलासह थकबाकी भरावी : अग्रवाल

वीजबिल वसुलीसाठी पुण्यात अचानक तपासणी

    04-Nov-2026
Total Views |
 
Veej
पुणे, 3 नाेव्हेंबर (आ.प्र.) :
वीजबिलाच्या थकबाकीपाेटी खंडित केलेली वीजजाेडणी चालू वीजबिलासह संपूर्ण थकबाकी भरल्याशिवाय पूर्ववत करू नये, अशा सूचना महावितरणचे कार्यकारी संचालक दिनेश अग्रवाल यांनी दिल्या. या पाहणीवेळी प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर, कार्यकारी अभियंता रवींद्र बुंदिले, अतिर्नित कार्यकारी अभियंता प्रमाेदकुमार गायकवाड आणि अमिता देशमुख उपस्थित हाेते. ऑक्टाेबरच्या अखेरच्या दिवशी त्यांनी विश्रांतवाडी आणि वाडिया उपविभागांना आकस्मिक भेटी देऊन थकबाकीदारांच्या खंडित वीजजाेडण्यांची पाहणी वाडिया उपविभागातील फिस्टहाऊस हाॅस्पिटॅलिटी आणि प्रभावती पिंगळे या दाेन थकबाकीदारांच्या वीजजाेडण्यांची त्यांनी तपासणी केली. या ग्राहकांकडे अनुक्रमे 7 लाख 69 हजार रुपये आणि 5 लाख 44 हजार रुपये थकबाकी हाेती.
 
फिस्टहाऊस हाॅस्पिटॅलिटीकडून हप्त्यांमध्ये र्नकम भरली जात असल्याने थकबाकी कायम राहत असल्याचे निदर्शनास आले.
अशा प्रकरणांत चालू वीजबिलासह संपूर्ण देय र्नकम वसूल झाल्यानंतरच वीजजाेडणी पूर्ववत करावी, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
वीजबिल वसुलीची कार्यवाही केवळ कार्यालयीन स्तरावर मर्यादित न ठेवता अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात उतरून तिचा आढावा घ्यावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी थकबाकी वसुलीसाठी सुरू असलेल्या उपाययाेजनांना अधिक गती देऊन चालू वीजबिलासह थकबाकी वसूल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ग्राहकांना सेवा देणे ही महावितरणची जबाबदारी आहे, तर वेळेत वीजबिल भरणे हे ग्राहकांचे कर्तव्य आहे.