जैन अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष गांधी यांची मुलाखत

    04-Nov-2026
Total Views |
 
Jain
मुंबई, 3 नाेव्हेंबर (आ.प्र.) :
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांची विशेष मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.
 
जैन समाजातील विद्यार्थी, युवक, महिला आणि उद्याेजकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे; तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध याेजनांची माहिती या मुलाखतीतून देण्यात येणार आहे. या कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवारी (4) आणि गुरुवारी (5 नाेव्हेंबर) सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित हाेईल. तसेच न्यूज ऑन एआयआर या अ‍ॅपवरही ही मुलाखत ऐकता येणार आहे. या मुलाखतीचे निवेदन निवेदक प्रणय चव्हाण यांनी केले आहे. महामंडळाची स्थापना, उद्दिष्टे आणि कार्याची व्याप्ती, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज याेजना, युवकांसाठी स्वयंराेजगार व उद्याेग- व्यवसायासाठी उपलब्ध आर्थिक साह्य आदीविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.