काेल्हापूर, 2 नाेव्हेंबर (आ.प्र.) :
यंदा पाऊस कमी झाल्यामुळे पाणी नियाेजनाला महत्त्व आले आहे. काेल्हापूर जिल्ह्यात बरी परिस्थिती आहे. तरीही शेतीच्या पाण्याचे नियाेजन यंदा जलसंपदा विभाग आणि स्थानिक इरिगेशन फेडरेशन, लाेकप्रतिनिधी मिळून करणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. जिल्ह्यात 85.5 टीएमसी पाणी उपलब्ध असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
ऑगस्ट 2027 पर्यंतचे पिण्याचे पाणी आरक्षित करण्यात आले असून, शिल्लक राहणाऱ्या पाणीसाठ्यावर आधारित रब्बी व उन्हाळी हंगामाचा पिण्यासाठी व सिंचनासाठी आराखडा तयार करण्यात आल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. केटी वेअर दुरुस्ती, देखभाल, बरगे लावणे-काढणे, पाण्याचे नियाेजन याबाबतचा निर्णय जलसंपदा विभाग आणि इरिगेशन फेडरेशन, लाेकप्रतिनिधी संयु्नतपणे घेतील.
शेतकऱ्यांना उपलब्ध हाेणाऱ्या पाण्याबाबत माहिती मिळण्यासाठी अधीक्षक अभियंता कार्यालयामध्ये आणि प्रत्येक कार्यकारी अभियंता कार्यालयामध्ये हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
शेतकऱ्यांना पाण्याच्या केलेल्या नियाेजनाबाबत वस्तुनिष्ठ माहिती देण्याची गरज आहे. त्यासाठी कालवा निरीक्षकांचे संपर्क क्रमांक त्यांना उपलब्ध करून द्यावेत, असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.