त्र्यंबकेश्वर, 1 नाेव्हेंबर (आ.प्र.) :
पवित्र कुशावर्त तीर्थ, गाेदावरीच्या सान्निध्यात मंत्राेच्चार, शंखनाद आणि साधू-महंतांच्या उपस्थितीत येथे सिंहस्थ कुंभमेळा ध्वजाराेहणाचा मंगलमय साेहळा संपन्न झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शृंगेरीपीठाचे जगद्गुरू शंकराचार्य विधुशेखर भारती यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित हाेते. ध्वजाराेहणाद्वारे सिंहस्थ कुंभमेळा पर्वाचा मंगलारंभ झाला.
प्रारंभी गाेदावरीचे विधिवत पूजन करण्यात आले. पुराेहितांनी मंत्राेच्चारांतून गाेदावरीचे स्तवन केले. त्यानंतर संकल्पविधी झाला.
सर्व प्राणिमात्रांना सुखशांती, समृद्धी आणि कल्याण लाभावे, अशी प्रार्थना करण्यात आली. गाेदावरी गंगा प्रार्थना आणि सामूहिक प्रार्थनेने संपूर्ण परिसर भ्नितमय झाला हाेता. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजस्तंभाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर धर्मध्वज आणि ध्वजपताकेचे विधिवत पूजन झाले. जगद्गुरू शंकराचार्य विधुशेखर भारती यांनीही धर्मध्वजाचे पूजन केले. या साेहळ्यास आमदार हिरामण खाेसकर, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, विशेष पाेलीस महानिरीक्षक संजय ऐनपुरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पाेलीस अधीक्षक डाॅ. एस. स्वामी यांच्यासह विविध संत महंत व नागरिक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.