पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्र पर्यटनाच्या दालनाला भेट

    02-Nov-2026
Total Views |

Kevadiya 
केवडिया, 1 नाेव्हेंबर (आ.प्र.) :
महाराष्ट्र पर्यटन विभागाने केवडिया (एकतानगर) येथे राष्ट्रीय एकता दिन आणि भारत पर्व 2026 च्या निमित्ताने आयाेजित उपक्रमात महाराष्ट्राचे विशेष पर्यटन दालन उभारले आहे. या दालनाला पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी भेट दिली.
 
महाराष्ट्राच्या पारंपरिक हातमागावरील देखण्या पैठणी साड्यांची पंतप्रधानांनी पाहणी केली. पैठणी वीणकामातील कलाकुसर, पारंपरिक तंत्र, त्यातील बारकावे आणि महाराष्ट्राच्या समृद्ध वस्त्रपरंपरेची त्यांनी माहिती जाणून घेतली. पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक विजय जाधव आणि त्यांच्या चमूने पंतप्रधानांचे स्वागत केले. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने उभारलेल्या या विशेष दालनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळे, समृद्ध सांस्कृतिक वारसा, पारंपरिक कला, खाद्यसंस्कृती आणि हस्तकलेचे दर्शन देशभरातील पर्यटकांना घडवण्यात येत आहे. महाराष्ट्रातील गडकिल्ले, समुद्रकिनारे, धार्मिक स्थळे, निसर्गरम्य पर्यटनस्थळे, साहसी पर्यटन, ग्रामीण पर्यटन आणि सांस्कृतिक परंपरांची माहिती पर्यटकांना देण्यात येत आहे. पैठणीसारखी पारंपरिक वस्त्रकला, स्थानिक खाद्यपदार्थ, हस्तकला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून राज्याच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख करून देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
 
महाराष्ट्र पर्यटनाच्या दालनाला भेट दिल्याबद्दल आणि राज्याच्या सांस्कृतिक वारशाची दखल घेतल्याबद्दल आम्ही पंतप्रधानांचे आभार मानताे. त्यांच्या या भेटीमुळे महाराष्ट्राच्या पर्यटनवैभवाला राष्ट्रीय स्तरावर व्यापक प्रसिद्धी मिळण्यासाेबतच राज्यातील पर्यटनस्थळांकडे देशभरातील पर्यटकांचे लक्ष वेधले जाण्यास चालना मिळण्यास मदत हाेईल, अशी प्रतिक्रिया पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे यांनी व्य्नत केली.