अहिल्यानगरमध्ये जलस्रोतांच्या १ किमी परिसरात उपशावर बंदी

जिल्ह्यातील २०८ गावे व १२३० वाड्यांना २२० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

    02-Nov-2026
Total Views |

Water 
अहिल्यानगर, 1 नाेव्हेंबर (आ.प्र.) :
पाणीयाेजना अवलंबून असलेल्या जलस्राेतांच्या 1 किमी परिसरात पाणी उपशावर जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली असून, असा अवैध पाणीउपसा हाेत असल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. अवैध पाणीउपसा राेखण्यासाठी तालुकानिहाय पथके नियु्नत करण्यात आली आहेत. या पथकांनी श्रीगाेंदे तालुक्यात गुन्हे दाखल केले आहेत.
 
जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीतील उपाययाेजनांची माहिती देण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने आयाेजिलेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डाॅ. पंकज आशिया यांनी ही माहिती दिली. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयु्नत उमेश पाटील, जीवन प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंता सुनंदा नरवाडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुधीर आरडकर उपस्थित हाेते.
 
जिल्ह्यात टंचाई निवारणार्थ ऑक्टाेबर 2026 ते जून 2027 या कालावधीसाठी 1110 गावे 5234 वाड्यांसाठी एकूण 3887 उपायाेजनांचा संभाव्य टंचाई आराखडा प्रस्तावित करण्यात आला असून, आराखडा अंदाजित 470 काेटी रकमेचा आहे. सध्या टंचाईग्रस्त 208 गावे व 1230 वाड्यांसाठी 220 टँकरद्वारे 4 लाख 12 हजार 892 लाेकसंख्येला पाणीपुरवठा सुरू आहे.
आता यात जनावरांची संख्या गृहीत धरून पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
 
टँकर भरण्यासाठी व पाणीपुरवठ्यासाठी एकूण संभाव्य 150 उदभवांचे स्राेत नियाेजित करण्यात आले असून, यात एमआयडीसीतील 1, सार्वजनिक विहिरी व कूपनलिका 134, टँकर फीडिंग पाॅइंट 8, जलशुद्धीकरण केंद्र 47 याचा समावेश आहे. टँकरचे पाणी गावातील टाक्यांमध्ये भरले जाणार आहे. अशा 163 गावांमध्ये टाक्या खरेदीसाठी 4.43 काेटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
 
जेथे टँकर भरले जातात अशा ठिकाणी जलशुद्धीकरण यंत्रणा उभारून पाणीपुरवठा केला जाईल. त्यात राक्षी व अमरापूर (शेवगाव), मांदळी व दूरगाव (कर्जत) आणि पांढरी पूल येथील टँकर पाॅइंटचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.