महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये ८.५७ लाख कोटींचे करार

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ६७ करारांवर झाल्या स्वाक्षऱ्या

    05-Oct-2026
Total Views |
 
MaharashtraUdyogVikas
मुंबई, 4 सप्टेंबर (आ.प्र.) :
महाराष्ट्र इन्व्हेस्टंमेंट समिटंमध्ये राज्याच्या औद्याेगिक विकासाला माेठी चालना देणारे 8 लाख 57 हजार 452 काेटींच्या गुंतवणुकीचे 67 सामंजस्य करार मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या गुंतवणुकीतून 2 लाख 91 हजार 109 राेजगारांच्या निर्मितीची अपेक्षा आहे.
 
या करारांमध्ये एराेस्पेस अँड डिफेन्स तसेच ऊर्जा आणि क्लिनटेक क्षेत्रातील प्रत्येकी 10 करारांचा समावेश आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने डेटा सेंटर्स, माहिती-तंत्रज्ञान आणि सेमीकंडक्टर क्षेत्र आघाडीवर असून या क्षेत्रात 4 लाख 15 हजार 490 काेटींची गुंतवणूक प्रस्तावित आहे. ऊर्जा, क्लिनटेक, नवीकरणीय ऊर्जा, बॅटरी एनर्जी आणि काॅम्प्रेस्ड बायाेगॅस क्षेत्रात 1 लाख 2 हजार 519 काेटींचे करार झाले आहेत. अंतरिक्ष व संरक्षण क्षेत्रात 27930 काेटी, तर मेटल्स आणि मायनिंग क्षेत्रात 75 हजार काेटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले आहेत.
 
इलेक्ट्राॅनिक्स क्षेत्रात 12651 काेटी, आराेग्य क्षेत्रात 6500 काेटी, पायाभूत सुविधा, लाॅजिस्टिक्स व बांधकाम साहित्य क्षेत्रात 18751 काेटी तसेच स्टील उत्पादन क्षेत्रात 7 हजार काेटींच्या गुंतवणुकीचे करार झाले आहेत.
 
केमिकल्स, शेती, सेवा आणि ग्लाेबल कॅपॅबिलिटी सेंटर्स क्षेत्रात 8801 काेटी, तर अन्य विविध क्षेत्रांत 1 लाख 82 हजार 810 काेटी गुंतवणूक प्रस्तावित आहे.
 
महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत झालेल्या या करारांमुळे राज्यातील औद्याेगिक विस्तार, आधुनिक तंत्रज्ञानाधारित उद्याेग आणि माेठ्या प्रमाणातील राेजगारनिर्मितीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.