'महाराष्ट्र सुपुत्र कॅप्टन स्मित यांचा सार्थ अभिमान'

    05-Oct-2026
Total Views |

Captain 
मुंबई, 4 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
स्वतःवर प्राणघातक हल्ला झाला असतानाही फ्लाय दुबई विमानाचे पायलट कॅप्टन स्मित माछर यांनी प्रसंगावधान राखून धीराेदात्तपणे विमानातील 180 प्रवाशांचे प्राण वाचवले. या असाधारण आणि प्राणाची बाजी लावणाऱ्या धैर्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकर कॅप्टन स्मित यांचा खरा हिराे असा उल्लेख करत त्यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्र सुपुत्र कॅप्टन स्मित तमाम भारतीयांसाठी सार्थ अभिमान ठरल्याचे काैतुकाेद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
 
मुंबईचा सुपुत्र आणि खरा हिराे कॅप्टन स्मित यांच्याबद्दल मला अभिमान वाटताे. स्मित यांनी अत्यंत असाधारण आणि विलक्षण पद्धतीने प्रवाशांचे प्राण वाचवले. गंभीर दुखापतीतही स्मित यांनी दाखवलेली प्रसंगावधानता आणि धैर्य अनुकरणीय आहे. कठीण प्रसंगात प्रवाशांनीही एका टीमप्रमाणे तत्परतेने काम केले. त्यांनाही सलाम. स्मित लवकर बरे व्हावेत आणि त्यांना उत्तम आराेग्य लाभाे, अशी कामना करताे.