सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणासाठी नाशिक, त्र्यंबकनगरी सज्ज

कडक सुरक्षा अन् उत्साहही : राष्ट्रपतींच्या हस्ते गोदा आरती

    31-Oct-2026
Total Views |

KumbhM 
नाशिक, 30 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजाराेहणाच्या साेहळ्यासाठी नाशिक व त्र्यंबकनगरी सज्ज झाली आहे. गाेदाकाठावर या अनुषंगाने व्यासपीठ, कार्यक्रम स्थळाकडे येणारे रस्ते, भाविक; तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययाेजना करण्यात आल्या आहेत. राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांच्या हस्ते व साडेसहा हजार आदिवासी महिलांच्या उपस्थितीत संध्याकाळी गाेदाआरती करण्यात येणार असून, एकूणच सिंहस्थासाठीचा उत्साह नाशिककरांत दिसून येत आहे.
 
धर्मध्वज अनावरण साेहळा शनिवारी दुपारी 12.02 मिनिटांनी हाेणार आहे. राष्ट्रपतींसह राज्यपाल, मुख्यमंत्री व अन्य अनेक मान्यवर या साेहळ्यास उपस्थित राहणार आहेत. या अनुषंगाने शहरात कडेकाेट बंदाेबस्त ठेवण्यात आला आहे. रामकुंडाजवळ धर्मध्वज फडकवण्यात येईल. ध्वजाराेहणप्रसंगी काेणतेही भाषण हाेणार नाही.
 
या साेहळ्यासाठी एल आकाराचा मंच उभारण्यात आला आहे. व्यासपीठावर सहा आखाड्याचे संत, चार चतु:संप्रदायाचे महंत, उज्जैनचे राधेबाबा यांना स्थान देण्यात येणार आहे. ध्वजाराेहण साेहळ्यानंतर सायंकाळी महाआरती कार्यक्रमासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
 
महाआरती साेहळ्यात 13 आखाडे; तसेच त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या नगरसेवकांना आमंत्रित करण्यात आले आहे. नागरिक डाव्या तीरावर, तर आरती करणारे उजव्या तीरावर राहतील. दाेन्ही ठिकाणची गर्दी एकत्र येऊ नये यासाठी कार्यक्रम स्थळाकडे येणाऱ्या रस्त्यांवर ठिकठिकाणी दुभाजक टाकण्यात आले आहेत.
 
नागरिकांना बसण्यासाठी पाच हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. गाेदाआरतीमुळे भाजी मंडई अन्य ठिकाणी हलवण्यात आली असून, गाडगे महाराज पुलाखालील गाैरी पटांगण येथे उभे राहण्याची व्यवस्था आहे. गाेदाआरतीचा कार्यक्रम सर्वांना दिसावा यासाठी गाेदाकाठावर ठिकठिकाणी स्क्रीन लावण्यात आले आहेत. दरम्यान, शहरातील आणि त्र्यंबकेश्वर मार्गावरील वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आले आहेत.
 
राष्ट्रपती या साेहळ्यास उपस्थित राहणार असल्याने शहर परिसरात ड्राेन उड्डाणास बंदी घालण्यात आली आहे. या साेहळ्यासाठी शहरात स्वच्छताही करण्यात आली आहे. नागरिकांनी घरांवर भगवे ध्वज फडकवावेत, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले हाेते. त्यालाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळताे आहे. धर्मध्वज साेहळ्यामुळे कुंभपर्वास प्रारंभ हाेणार असल्याने नाशिक व त्र्यंबकमध्ये माेठा उत्साह दिसून येत आहे.