मुंबई, 30 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षांमधील प्रश्नपत्रिका किंवा उत्तरतालिका फुटण्याच्या कथित प्रकरणांची चाैकशी करण्यासाठी चाैकशी आयाेग स्थापन करण्यात आला आहे. या संदर्भात व्य्नती, परीक्षार्थी, विद्यार्थी तसेच संबंधित संस्थांनी आपली निवेदने 16 नाेव्हेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करावीत, असे आवाहन महाराष्ट्र लाेकसेवा आयाेग परीक्षा चाैकशी आयाेगाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती दिलीप भाेसले यांच्या अध्यक्षतेखाली चाैकशी आयाेग स्थापन करण्यात आला आहे. आयाेगामार्फत औषध निरीक्षक परीक्षा गट-ब, 2025; महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयु्नत पूर्व परीक्षा 2025; महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयु्नत मुख्य परीक्षा 2025; महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025; महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा, 2025; महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024; अन्न व औषध प्रशासन सेवा मुख्य परीक्षा 2023; महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2025 आणि महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2025 या नऊ परीक्षांशी संबंधित प्रकरणांची चाैकशी करण्यात येणार आहे.