वाहतूक कंपन्यांसाठी डिजिटल सक्षम यंत्रणा उभारावी

मुख्यमंत्र्यांचे निर्देश; महाराष्ट्र अॅग्रीगेटर नियमावलीसंदर्भात आढावा बैठक =

    31-Oct-2026
Total Views |
 
CMFadanvis
मुंबई, 30 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
राज्यातील अ‍ॅपआधारित प्रवासी वाहतूक सेवा अधिक सुरक्षित, पारदर्शक करण्यासाठी अ‍ॅग्रीगेटर कंपन्यांच्या वाहनांची, चालकांची आणि त्यांच्या कामाच्या तासांची अद्ययावत माहिती उपलब्ध करून देणारा अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफाॅर्म तयार करावा. या प्लॅटफाॅर्मला कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित विश्लेषणाची जाेड देऊन वाहनांचे संचालन, चालकांची नियु्नती, पार्किंगची व्यवस्था आणि प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवांवर प्रभावी नियंत्रण ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
 
महाराष्ट्र अ‍ॅग्रीगेटर नियमावली-2026 संदर्भात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अ‍ॅग्रीगेटर क्षेत्रातील वाढती वाहन संख्या, स्वतंत्र टॅक्सीचालकांच्या समस्या, प्रवाशांची सुरक्षितता आणि डिजिटल प्लॅटफाॅर्मवरील प्रवास वाटपातील पारदर्शकता या मुद्द्यांचा वर्षा निवासस्थानी आढावा घेतला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयु्नत राजेश नार्वेकर यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित हाेते.
 
अ‍ॅग्रीगेटर कंपन्यांकडून चालवल्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची नाेंदणी, त्यासाठी वापरले जाणारे पार्किंगचे ठिकाण, संबंधित चालकाची माहिती, वाहन चालवण्याचा परवाना, पाेलीस पडताळणी आणि अन्य आवश्यक कागदपत्रांचा तपशील डिजिटल स्वरूपात उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे दिवसभरात वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये काेणता चालक काेणते वाहन चालवताे, याची अद्ययावत नाेंद या प्रणालीत असावी. एखादी घटना घडल्यास संबंधित वाहन आणि चालकाची माहिती तातडीने उपलब्ध हाेईल, अशी सक्षम यंत्रणा उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.