रक्ताचा धोकादायक आजार : हिमोफिलिया

    31-Oct-2026
Total Views |
 
Hemophilia
आजही भारतातील अशी अनेक शहरे आणि गावे आहेत जिथल्या रुग्णालयांमध्ये हिमाे फिलिया चाचणीची सुविधा नाही. माणसाला शेवटपर्यंत कळतच नाही की त्याला किती गंभीर आजार झाला आहे. सरकारने याची दखल घ्यायला हवी.
सामान्य माणसाच्या शरीरावर लहान- माेठी जखम झाली, आणि त्यावर औषध लावले नाही तरी थाेड्या वेळात रक्त येणे बंद हाेते. ताज्या जखमेतून वाहणारे रक्त शेवटी थांबते आणि तिथे रक्ताची गाठ / खपली धरते. यामध्ये आपल्याला काहीच करावे लागत नाही. शरीरात असलेले सिक्युरिटी गार्ड्स अशा परिस्थितीत स्वतःच कामाला लागतात. परंतु हिमाेफिलिक रुग्णाची गाेष्ट वेगळी आहे. त्यांच्या शरीरात निसर्गाने खूप कमकुवत सुरक्षा यंत्रणा ठेवली आहे.
 
काेणत्याही अवयवातून रक्त येणे सुरू झाले की ते थांबण्याचे नावच घेत नाही. त्वचा कापली गेली तर धडाधड रक्त बाहेर वाहू लागते आणि मुका मार बसला तर शरीराच्या आत रक्तस्राव सुरू हाेताे, दाेन्ही परिस्थिती जीवघेण्या ठरू शकतात. जगात दर चाळीस हजार लाेकांमध्ये एक व्यक्ती हिमाेफिलिक असल्याचा अंदाज आतापर्यंत लावला जात हाेता, परंतु आता अनेक संशाेधकांनी अशी भीती व्यक्त केली आहे की आपण मानताे त्यापेक्षा दुप्पट संख्येने हिमाेफिलियाचे रुग्ण आपल्यामध्ये राहत आहेत. साेप्या शब्दांत सांगायचे तर हिमाेफिलिया हा रक्ताचा आजार आहे.
 
आपल्या शरीरात वाहणारे रक्त वेगवेगळ्या घटकांपासून बनलेले असते. तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा.
प्लाझ्मामध्ये असलेले वेगवेगळे तेरा प्रकारचे प्रथिने फॅक्टर म्हणूनही ओळखले जातात. हे फॅक्टर रक्त गाेठण्यासाठी म्हणजेच क्लाॅटिंगसाठी जबाबदार असतात, परंतु रक्तामध्ये यांपैकी एकही फॅक्टर गैरहजर असेल तर ब्लड क्लाॅटिंग म्हणजेच रक्त गाेठण्याची प्रक्रिया अत्यंत मंदावते. बहुतांश हिमाेफिलिक रुग्णांच्या रक्तात आठ आणि नऊ क्रमांकाच्या फॅक्टरची अनुपस्थिती असते.
 
आजही भारतातील अशी अनेक शहरे आणि गावे आहेत जिथल्या रुग्णालयांमध्ये हिमाेफिलिया चाचणीची सुविधा नाही.
माणसाला शेवटपर्यंत कळतच नाही की त्याला किती गंभीर आजार झाला आहे. यामध्येच ताे मरेपर्यंत हिमाेफिलियाच्या नावापासून अनाेळखी राहताे असेही घडत असेल. रुग्णांच्या रक्तात आठ आणि नऊ क्रमांकाच्या फॅक्टरची अनुपस्थिती असते.
 
आजही भारतातील अशी अनेक शहरे आणि गावे आहेत जिथल्या रुग्णालयांमध्ये हिमाे फिलिया चाचणीची सुविधा नाही. माणसाला शेवटपर्यंत कळतच नाही की त्याला किती गंभीर आजार झाला आहे. यामध्येच ताे मरेपर्यंत हिमाेफिलियाच्या नावापासून अजाण राहताे असेही घडत असेल.