टोलनाक्यापासून २० किमी अंतरावरील रहिवाशांना सवलतीचा पास !

    31-Oct-2026
Total Views |
 
Toll
नवी दिल्ली, 30 ऑ्नटाेबर (वि.प्र.) :
टाेलनाक्याच्या 20 किलाेमीटर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सवलतीत वार्षिक टाेल पासची याेजना जाहीर केली आहे.
 
ही याेजना 1 नाेव्हेंबरपासून लागू हाेणार असून, कामानिमित्त शिक्षणासाठी किंवा दैनंदिन गरजांसाठी वारंवार टाेलनाका ओलांडणाऱ्या स्थानिक वाहनधारकांना तिचा लाभ मिळणार आहे.
 
मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, नगरपालिका किंवा स्थानिक शहर हद्दीबाहेर असलेल्या टाेलनाक्यांसाठी वार्षिक सवलतीच्या पासची किंमत 1,500 रुपये असेल, तर नगरपालिका किंवा शहराच्या स्थानिक हद्दीतील टाेलनाक्यांसाठी वर्षाला 3,000 रुपये भरावे लागतील. या निर्णयामुळे टाेलनाक्याजवळ राहणाऱ्या व नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या टाेल खर्चात बचत हाेण्याची अपेक्षा आहे.
 
टाेलनाक्यापासून 20 किलाेमीटर अंतराच्या आत राहणाऱ्या पात्र नागरिकांना या याेजनेचा लाभ घेता येईल. मात्र, त्यासाठी वाहनावर वैध व कार्यरत फास्टॅग (ऋअडढरस) असणे आवश्यक आहे. तसेच वाहनाची नाेंदणी व्यावसायिक वापरासाठी झालेली नसावी.
या याेजनेअंतर्गत दिला जाणारा वार्षिक पास केवळ संबंधित टाेलनाक्यासाठीच वैध असेल. इतर टाेलनाक्यांवर त्याचा वापर करता येणार नाही.
 
मासिक वा वार्षिक पासचा पर्याय पात्र वाहनधारकांना त्यांच्या प्रवासाच्या गरजेनुसार उपलब्ध असलेला मासिक पास वा नव्याने सुरू हाेणारा सवलतीचा वार्षिक स्थानिक पास यापैकी एक पर्याय निवडता येईल.
 
दरराेज नाेकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा इतर आवश्यक कामांसाठी टाेलनाका ओलांडणाऱ्या स्थानिक रहिवाशांना ही सुविधा विशेष उपयुक्त ठरणार आहे.
 
या मार्गांवर मात्र सवलत मिळणार नाही! राष्ट्रीय महामार्ग किंवा द्रुतगती मार्गांवर बंदिस्त पद्धतीने टाेल आकारणी (क्लाेज्ड टाेल कलेक्शन सिस्टिम) हाेत असल्यास या सवलतीचा लाभ मिळणार नाही. तसेच संबंधित परिसरात प्रवासासाठी सेवा रस्ता किंवा पर्यायी रस्ता उपलब्ध असल्यास वाहनधारकांना सवलतीच्या स्थानिक पाससाठी पात्र मानले जाणार नाही. स्थानिक नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक परवडणारा व्हावा, हा या नव्या याेजनेचा प्रमुख उद्देश असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.