चोक्कलिंगम यांचे ओवळीये गावात जलसंधारणात श्रमदान; वनराई बंधाऱ्याचे केले जलपूजन

    30-Oct-2026
Total Views |

Vanrai 
मालवण, 29 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चाेक्कलिंगम यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसआयआरबाबतचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर मालवण तालुक्यातील ओवळीये येथे वनराई बंधाऱ्याच्या कामात सहभागी हाेत श्रमदान केले. जिल्ह्यात सुरू असलेल्या जलसंधारणाच्या लाेकचळवळीला शुभेच्छा देत त्यांनी या उपक्रमात काही काळ प्रत्यक्ष सहभाग नाेंदवला. तसेच, पूर्ण झालेल्या वनराई बंधाऱ्यात साठलेल्या पाण्याचे जलपूजन करून जलसंधारणाच्या कामाचे महत्त्व अधाेरेखित केले.
 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासनाच्या पुढाकारातून विविध ठिकाणी जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांत लाेकसहभागातून श्रमदानाला विशेष महत्त्व देण्यात येत आहे. ओवळीयेत चाेक्कलिंगम यांनी या कामात सहभागी हाेत श्रमदान केले. या वेळी जिल्हाधिकारी तृप्ती धाेडमिसे, उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर व वीरसिंग वसावे, तहसीलदार गणेश लव्हे, सरपंच रंजना पडवळ यांच्यासह शेतकरी उपस्थित हाेते. चाेक्कलिंगम यांनी ओवळीये गावातील काजू प्रक्रिया उद्याेगालाही भेट देऊन काजू प्रक्रियेच्या विविध टप्प्यांची सविस्तर माहिती घेतली. काजू बी संकलनापासून त्यावर केल्या जाणाऱ्या प्राथमिक प्रक्रियेपासून ते पॅकिंग आणि विक्रीसाठी उत्पादन तयार करण्यापर्यंतच्या प्रक्रियेची त्यांनी माहिती जाणून घेतली. काजू प्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री, उत्पादनाची गुणवत्ता राखण्यासाठी घेतली जाणारी काळजी, प्रक्रिया उद्याेगातील राेजगाराच्या संधी, तसेच स्थानिक काजू उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारे लाभ याविषयीही त्यांनी जाणून घेतले.