तेलंगणच्या जलसंपदा प्रकल्पाला सहकार्य करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    29-Oct-2026
Total Views |

WaterPr 
मुंबई, 28 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
तेलंगणातील थुमिडीहेट्टी जलसंपदा प्रकल्पाची उंची वाढवण्याबाबत तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या विनंतीनुसार या प्रकल्पविषयक मुद्द्यांचा महाराष्ट्र स्वतंत्र अभ्यास करेल. यासाठी दाेन्ही राज्यांचे मुख्य सचिव आणि जलसंपदा विभागांच्या सचिवांची संयु्नत समिती नेमून तांत्रिक मुद्दे आणि महाराष्ट्रातील संभाव्य बुडीत क्षेत्राचा अभ्यास केला जाईल. त्यानुसार महाराष्ट्रातील नागरिकांच्या हिताचे रक्षण करत तेलंगणला सहकार्याची सकारात्मक भूमिका घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
 
तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. तेलंगणचे जलसंपदा मंत्री उत्तमकुमार रेड्डी यांनी थुमिडीहेट्टी प्रकल्पाविषयी माहिती देऊन प्रकल्पाची उंची 148 वरून 152 मीटरपर्यंत वाढवण्यासाठी महाराष्ट्राने मान्यता द्यावी, अशी विनंती केली.
 
बुडीत क्षेत्रावर हाेणारा परिणाम, संबंधित अभयारण्याचा समावेश आणि नदीपात्राबाहेरील आवश्यक जमिनीच्या क्षेत्राचा अभ्यास केला जाईल. महाराष्ट्राच्या अभ्यासावर तेलंगणला काही आक्षेप जाणवल्यास दाेन्ही राज्यांचे अधिकारी त्यावर चर्चा करतील. आवश्यकता भासल्यास तज्ज्ञांचे मतही घेतले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.