दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राज्यपाल वर्मा यांच्याकडून भ्रष्टाचार निर्मूलनाची सत्यनिष्ठा प्रतिज्ञा

    29-Oct-2026
Total Views |
 
Oath
मुंबई, 28 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी लाेकभवनातील अधिकारी व कर्मचारी; तसेच लाेकभवनातील पाेलीस अधिकारी व अंमलदारांना भ्रष्टाचार निर्मूलनाची सत्यनिष्ठा प्रतिज्ञा दिली. देशाच्या आर्थिक, राजनीतिक आणि सामाजिक प्रगतीत भ्रष्टाचार हा माेठा अडथळा आहे. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी सरकार, नागरिक आणि खासगी क्षेत्रासह सर्व भागधारकांनी एकत्रित येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक नागरिकाने भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्यात साथ दिली पाहिजे, असे सत्यनिष्ठा प्रतिज्ञेत म्हटले आहे. राज्यपालांचे सचिव डाॅ. प्रशांत नारनवरे यांनी राज्यपाल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संदेश वाचून दाखवले. 26 ऑक्टाेबर ते 1 नाेव्हेंबर या कालावधीत राज्यात दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयाेजन करण्यात आले असून, समृद्धीसाठी सत्यनिष्ठा हे या सप्ताहाचे ब्रीदवाक्य आहे.