थायरॉइड या आजाराचे दोन प्रकार समजून घ्यावे

    28-Oct-2026
Total Views |

Thyroid 
गळ्याच्या समाेरच्या भागात ज्या ग्रंथी असतात त्यांना थायराॅइड म्हणतात. त्यातून जे हार्माेन्स निघतात त्यांना थायराॅइड हार्माेन म्हटले जाते. या हार्माे न्समुळे शरीराच्या अवयवांच्या क्रियांवर नियंत्रण ठेवले जाते. थायराॅइडचे दाेन प्रकार असतात. हायपाेथायराॅइडीझम आणि हायपरथायराॅइडीझम. या थायराॅइड ग्रंथी मानेखालच्या भागात असतात.
 
वजनामध्ये अचानक फरक येणे हे थायराॅईडचे सर्वात सामान्य लक्षण आहे. वजन वाढणे हे थायराॅईड हार्माेन कमी हाेण्याचे संकेत आहेत.
 
थायराॅईड शरीरात आवश्यकतेपेक्षा अधिक हार्माेन्स उत्पादित करत असेल तर तुमचे वजन अचानक कमी हाेते आणि याच्या उलट जर कमी उत्पादन हाेत असेल तर वजन वाढते. मानेजवळ आलेली सूज ही थायराॅईडच्या लक्षणांचे संकेत देते.
 
त्यामुळे कधीकधी मानेजवळ आलेली सूज थायराॅईड कॅन्सरलादेखील कारणीभूत ठरू शकते. थायराॅईड हार्माेन शरीराच्या सर्वच भागांना प्रभावित करते आणि हृदयाची गती त्यावर त्वरीत परिणाम करते. जर हृदयाची गती हळूवार झाली अथवा अचानक वाढली तर थायराॅईडची त्वरीत तपासणी करून घेण्याची गरज आहे. थायराॅईड असेल तर मूडमध्ये सतत बदल हाेत राहतात आणि ऊर्जेचा स्तर कमी हाेताे. व्यक्तीला सतत थकवा जाणवताे. त्याशिवाय आळस येणे, उदासिनता येणे, चिंता, नैराश्य आणि झाेप न येणे, बेचैनी वाटणे अथवा सतत चिडचिड हाेणे हे सर्व दिसून येते.
 
केसगळती हादेखील एक मुख्य संकेत आहे. थायराॅईड हार्माेन असंतुलित आहे हे कळण्यासाठी केसगळती अधिक प्रमाणात हाेत असेल तर संकेत दिसून येताे. अधिकांश बाबतीत या आजाराचा इलाज केल्यानंतर केस पुन्हा उगवतात.
वरील लक्षणांपैकी काेणत्याही लक्षणांबाबत जाणवत असेल तर वेळीच सावध व्हा. दुर्लक्ष करू नका.