कचरा जाळल्याने भूमिगत वीजवाहिन्या जळाल्या

ताथवडे-पुनावळेतील १६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

    28-Oct-2026
Total Views |

Pune 
पुणे, 27 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
वाल्हेकरवाडीत महादेव मंदिराजवळील उड्डाणपुलाच्या परिसरात अज्ञात व्य्नतीने कचरा जाळण्याने 26 ऑक्टाेबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास टीसीओ-1 आणि टीसीओ-2 या उच्चदाब भूमिगत विद्युत वाहिन्यांच्या चालू व पर्यायी अशा दाेन्ही 22 केव्ही इनकमर केबल जळाल्या.
 
यामुळे 22/11 केव्ही बेंचमार्क उपकेंद्र आणि 22/11 केव्ही पेठकर उपकेंद्रांतून निघणाऱ्या 11 केव्ही उच्चदाब वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला.
 
या घटनेमुळे पुणे-मुंबई महामार्गाच्या पश्चिमेकडील ताथवडे आणि पुनावळे परिसरातील सुमारे 15 ते 16 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. चालू वीजवाहिनीसह पर्यायी वाहिनीची केबलही जळाल्यामुळे अन्य पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरळीत करण्यावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे बाधित वीजवाहिन्यांच्या केबल जाेडण्यांसह वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. केबल दुरुस्तीचे काम पूर्ण करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वताेपरी प्रयत्न सुरू असल्याचे मबावितरणने स्पष्ट केले. उच्चदाब भूमिगत वीजवाहिन्या, वीज केबल्स; तसेच वीजयंत्रणेजवळ कचरा जाळल्यामुळे केबल्सचे नुकसान हाेऊन माेठ्या परिसरातील वीजपुरवठा खंडित हाेऊ शकताे. अशा घटनांमुळे नागरिकांना गैरसाेयीचा सामना करावा लागताे. महावितरणच्या वीजयंत्रणेचे नुकसान हाेण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी वीजवाहिन्या, भूमिगत केबल मार्ग आणि विद्युत यंत्रणेजवळ कचरा जाळू नये. कचऱ्याची याेग्य पद्धतीने विल्हेवाट लावून महावितरणच्या वीजयंत्रणेची सुरक्षितता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.