अमली पदार्थांचे व्यसन ही समाजापुढील गंभीर समस्या : राज्यपाल वर्मा यांचे प्रतिपादन

    28-Oct-2026
Total Views |

Rally 
मुंबई, 27 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
अमली पदार्थांचे व्यसन ही समाजापुढील विशेषतः तरुण पिढीसमाेरील गंभीर समस्या आहे. तरुण पिढीने अमली पदार्थमु्नत भारताचे राजदूत बनून जनजागृती, प्रतिबंध आणि पुनर्वसनावर भर द्यावा, असे आवाहन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.
 
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 151व्या जयंतीनिमित्त साजऱ्या हाेणाऱ्या राष्ट्रीय एकता दिनाच्या पार्श्वभूमीवर आयाेजित नशामु्नत भारत फाईट अगेन्स्ट ड्रग्ज या राष्ट्रीय माेटारसायकल रॅलीच्या शुभारंभप्रसंगी राज्यपाल बाेलत हाेते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महापाैर ऋतू तावडे, पाेलीस महासंचालक सदानंद दाते, पाेलीस आयु्नत देवेन भारती, राज्यपालांचे सचिव डाॅ. प्रशांत नारनवरे आणि राज्य राखीव पाेलीस दलाचे अपर महासंचालक राजकुमार व्हटकर यांच्यासह विविध राज्यांतील पाेलीस अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित हाेते. राज्यपालांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर माेटारसायकल रॅलीने गुजरातकडे प्रस्थान ठेवले. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील पाेलीस दलांचे प्रतिनिधी; तसेच केंद्रीय राखीव पाेलीस दलाचे अधिकारी व जवान या रॅलीत सहभागी झाले आहेत. गुजरातेतील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे ही रॅली जाणार आहे.