मुंबई, 27 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रणासाठी संपूर्ण मुंबई महापालिका क्षेत्रात आठवड्यातून एक दिवस सर्व बांधकामे आणि पाडकामे बंद ठेवावीत, अशी सूचना मुंबई उपनगराचे पालक मंत्री आशिष शेलार यांनी महापालिका आयु्नत अश्विनी भिडे यांना पत्राद्वारे केली आहे. हिवाळ्यात वायू प्रदूषणाची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने प्रभावी उपाययाेजना राबवाव्यात, असेही त्यांनी सूचित केले. मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाबाबत नागरिकांकडून अनेक निवेदने प्राप्त झाली असून, मुंबई उच्च न्यायालयानेही हवेच्या खालावत चाललेल्या गुणवत्तेबाबत चिंता व्य्नत केल्याचे शेलार यांनी पत्रात नमूद केले आहे.
महापालिकेने बांधकाम स्थळांवरील प्रदूषण नियंत्रणासाठी केलेल्या उपाययाेजना, विभाग स्तरावरील तपासणी पथके, केंद्रीय हवा गुणवत्ता डॅशबाेर्डच्या माध्यमातून बांधकाम स्थळांवर ठेवण्यात येणारी देखरेख, राडाराेडा नियंत्रण प्रणाली, बेकरीमध्ये स्वच्छ इंधनाचा वापर आणि स्मशानभूमींमधील प्रदूषण नियंत्रण यंत्रणा यासारख्या प्रयत्नांचे शेलार यांनी स्वागत केले. 2017-18 पासून मुंबईतील पीएम-10 प्रदूषणाच्या पातळीत सुमारे 48 ट्न्नयांनी घट झाल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. मात्र, प्रदूषणावर प्रभावी नियंत्रणासाठी आणखी व्यापक उपाययाेजनांची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करून हवेची गुणवत्ता खालावताच उपाययाेजना तातडीने लागू करण्याची व्यवस्था असावी, अशी सूचना त्यांनी केली.
प्रदूषणग्रस्त भाग आणि प्रमुख वाहतूक मार्गांवर प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर करून रस्ते धुणे व पाण्याची फवारणी करणे, रात्रीच्या वेळी यांत्रिक पद्धतीने रस्ते स्वच्छ करणे, खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती आणि खाेदकामानंतर रस्ते पूर्ववत करावेत, असेही शेलार यांनी सांगितले.