लाडकी बहीणनंतर आता एकल महिलांसाठी स्वतंत्र योजना आणणार

राज्यातील १२ लाखांहून अधिक एकल महिलांना आर्थिक आणि सामाजिक आधार देण्याचा सरकारचा प्रयत्न

    28-Oct-2026
Total Views |

Mahila 
मुंबई, 27 ऑ्नटाेबर (आ.प्र.) :
महाराष्ट्र सरकार आता एकट्या राहणाऱ्या महिलांना आर्थिक आणि सामाजिक आधार देण्यासाठी नवीन याेजना आणण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याेजनेच्या धर्तीवर एकल महिलांसाठीही स्वतंत्र याेजना सुरू करण्याच्या दिशेने सरकारची पावले पडत आहेत. राज्यात सध्या 12 लाखांहून अधिक एकल महिला असल्याचा अंदाज असून, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या याेजनेचा विचार सुरू आहे.
 
 माहिती संकलित करण्यास सुरुवात याेजनेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून शिक्षण विभागामार्फत एकल महिलांची माहिती गाेळा करण्यास सुरुवात झाली आहे. शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची माहिती संकलित केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, राज्यात तीन लाखांहून अधिक एकल महिलांची नाेंद झाली आहे. याशिवाय तहसील आणि ग्रामस्तरावरही माहिती संकलित केली जाणार आहे.
 
 याेजनेच्या अधिकृत घाेषणेकडे लक्ष या याेजनेअंतर्गत किती आर्थिक मदत दिली जाणार, पात्रतेचे निकष काय असतील आणि याेजनेची अंमलबजावणी कधीपासून हाेणार, याबाबत अद्याप अधिकृत घाेषणा झालेली नाही. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर सरकारकडून याेजनेचे स्वरूप स्पष्ट केले जाण्याची शक्यता आहे. एकट्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या लाखाे महिलांना या प्रस्तावित याेजनेमुळे माेठा दिलासा मिळू शकताे. त्यामुळे राज्य सरकारच्या पुढील निर्णयाकडे एकल महिलांचे लक्ष लागले आहे.