मुंबई, 27 ऑ्नटाेबर :
(आज का आनंद न्यूज नेटवर्क)
सार्वजनिक आराेग्य विभागाला पुरवठा हाेत असलेली औषधे गुणवत्तापूर्ण असावीत यासाठी प्रथमच ड्रग डिटे्नशन यंत्रणा वापरण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आराेग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी सार्वजनिक आराेग्य विभागाचे आयुक्त डाॅ. संजय काटकर, डाॅ. संजय भाेकरे उपस्थित हाेते.
यावेळी भारतीय नाेबेल विजेते शास्त्रज्ञ सर सी.व्ही. रमण यांच्या रमण इफे्नटवर काम करणाऱ्या औषध शाेध यंत्रणेचे प्रात्यक्षिक देण्यात आले.
विभागाच्या वतीने राज्यातील आठ विभागांमध्ये यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. एका यंत्राची किंमत 1 काेटी 20 लक्ष रुपये असून या यंत्राच्या वापरासाठी स्वतंत्र आस्थापना आणि मानक कार्यपद्घती तयार करण्यात आली आहे. या माध्यमातून प्रत्यक्ष आराेग्य संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या औषधांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येणार असून यामुळे औषधांच्या गुणवत्तेबाबत तातडीने प्राथमिक निरीक्षण नाेंदवणे श्नय हाेणार आहे.
औषध शाेध यंत्रणा वापरण्यासाठी आठ विभागांसाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली असून प्रत्येक विभागात दाेन सदस्यांचे पथक कार्यरत राहणार आहे.
या पथकांकडून जिल्हा रुग्णालये, महिला रुग्णालये तसेच सार्वजनिक आराेग्य विभागाच्या अखत्यारीतील इतर आराेग्य संस्थांमध्ये उपलब्ध औषधांचे नमुने तपासण्यात येतील. औषध शाेध यंत्राद्वारे साधारण दाेन ते तीन मिनिटांत एका नमुन्याचे प्राथमिक निरीक्षण नाेंदवणे श्नय हाेणार आहे. राज्यात अशा तपासणीसाठी शासनमान्य 12 प्रयाेगशाळा उपलब्ध असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
आराेग्य सेवांमधील मनुष्यबळ अधिक सक्षम करण्यासाठी 4 नाेव्हेंबरला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे 1440 डाॅ्नटरांना एकाचवेळी नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत तर पुढील टप्प्यांत 1900 कम्युनिटी हेल्थ ऑफिसर नियुक्त करण्याचे नियाेजन करण्यात आले आहे.
आराेग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर 15 हजार कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नियु्नत्यांमुळे राज्यातील दुर्गम, आदिवासी, काेकण आणि ग्रामीण भागांतील उपकेंद्र स्तरावरील आराेग्य सेवा अधिक बळकट हाेण्यास मदत हाेणार आहे.
तालुका आणि विधानसभा मतदारसंघनिहाय आराेग्यवर्धिनी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांमध्ये आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य व सरपंचांचा सहभाग राहणार आहे.