नवी मुंबई, 27 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
मुंबई आणि महाराष्ट्राची व्यावसायिक क्षमता, कुशल मनुष्यबळ, सुरक्षित औद्याेगिक वातावरण आणि उद्याेजकतेच्या परंपरेच्या बळावर महाराष्ट्राला जागतिक स्तरावरील दागिने उत्पादन व निर्यातीचे प्रमुख केंद्र बनवण्याची क्षमता आहे. बदलत्या जागतिक व्यापार परिस्थितीशी जुळवून घेत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि शासन व उद्याेगाच्या माध्यमातून इंडिया ज्वेलरी पार्क हा प्रकल्प दागिने उद्याेगाच्या भविष्यातील विकासाचा महत्त्वपूर्ण केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्य्नत केला. महापेत इंडिया ज्वेलरी पार्क प्रकल्पाच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री बाेलत हाेते.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक, उद्याेग विभागाचे प्रधान सचिव डाॅ. पी. अन्बळगन, महाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र कुशवाह, रत्न व आभूषण निर्यात प्राेत्साहन परिषदेचे अध्यक्ष किरीट भन्साळी, उपाध्यक्ष शाैनक पारिख आदी मान्यवर उपस्थित हाेते. या प्रकल्पामुळे सुमारे 25 हजार काेटींची गुंतवणूक अपेक्षित असून, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपात राेजगाराच्या एक लाख संधी निर्माण हाेतील. हे अत्याधुनिक दागिने उत्पादन केंद्र राज्याला जागतिक स्तरावरील रत्न व आभूषण उत्पादन, व्यापार आणि निर्यातीचे प्रमुख केंद्र बनवण्यास महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास शिंदे यांनी व्य्नत केला.