नाशिकला रविवारी ५०१ जण करणार शंखांचा नाद; कुंभपर्वाची मंगलमय सुरुवात होणार

    24-Oct-2026
Total Views |

Kumbhmela 
नाशिक, 23 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये 25 ऑक्टाेबरला 501 जण एकाच वेळी शंखनाद करणार आहेत. काेजागरी पाैर्णिमेच्या मुहूर्तावर सायंकाळी सहाला हाेणाऱ्या या सामूहिक शंखनादातून विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या पुढाकारातून देवमामलेदार पटांगण परिसरात हा उपक्रम हाेणार असून, कुंभमेळ्याच्या ध्वजाराेहण साेहळ्यापूर्वी गाेदातीरावर शंखनादाचा निनाद घुमणार आहे. अमेरिकेत 303 जणांनी एकाच वेळी शंखनाद केल्याची नाेंद विद्यमान विश्वविक्रम म्हणून सांगितली जाते. हा विक्रम मागे टाकण्यासाठी 501 जण एकाच वेळी शंख फुंकणार आहेत. भारतीय संस्कृतीतील या प्राचीन परंपरेचा जागर करण्यासाेबतच नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
 
भारतीय धार्मिक परंपरेत काेणत्याही शुभकार्याच्या प्रारंभी शंखनाद करण्याला विशेष महत्त्व आहे. मंदिरांतील पूजाअर्चा, धार्मिक विधी आणि मंगलप्रसंगी शंखनादातून शुभारंभाची भावना व्यक्त केली जाते. शंखाचा नाद हा पावित्र्य, भक्तिभाव आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जाताे. कुंभमेळ्याच्या ध्वजाराेहण साेहळ्यापूर्वी हाेणारा हा सामूहिक शंखनाद त्यामुळे विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. या उपक्रमात 501 शंखवादक सहभागी हाेणार असून, त्यात स्थानिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांच्या सदस्यांचाही समावेश असेल. कार्यक्रमासाठी चेन्नईतून अस्सल शंख मागवण्यात येत आहेत.