पुणे, 23 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
ग्राहकांना तत्पर, सुलभ आणि प्रभावी सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महावितरणच्या गणेशखिंड मंडळात सेवा सेतूसेवा संकल्प अभियानांतर्गत विशेष ग्राहकाभिमुख माेहीम राबवण्यात आली. अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली काेथरूड, शिवाजीनगर, पिंपरी आणि भाेसरी या चार विभागांत हा उपक्रम राबवण्यात आला. या माेहिमेत सुट्टीच्या दिवशीही महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध साेसायट्यांमध्ये प्रत्यक्ष पाेहाेचून ग्राहकांच्या प्रलंबित कामांचा निपटारा केला.

केंद्राच्या निर्देशांनुसार 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टाेबर या कालावधीत राबवण्यात आलेल्या सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या परिसरातच महावितरणच्या सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. ग्राहकांना छाेट्या कामांसाठी कार्यालयात वारंवार जाण्याची गरज भासू नये, या उद्देशाने पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध वाॅर्ड कार्यालयांत सेवा स्टाॅल उभारण्यासह साेसायट्यांतही विशेष माेहीम राबवण्यात आली. रविवारी सुट्टीच्या दिवशीही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना सेवा दिली.
या माेहिमेदरम्यान 251 ग्राहकांच्या नावांमध्ये बदल करून नाेंदी अद्ययावत करण्यात आल्या. 189 ग्राहकांच्या वीजबिलावरील पत्त्यांमध्ये दुरुस्ती करण्यात आली, तर 160 ग्राहकांचे माेबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी महावितरणच्या प्रणालीत अद्ययावत करण्यात आले; तसेच 41 ग्राहकांची चुकीची वीजबिले दुरुस्त करण्यात आली.
अशाप्रकारे एकूण 641 ग्राहकांच्या कामांवर कार्यवाही करण्यात आली. याशिवाय 300 ग्राहकांना महावितरणचे माेबाइल अॅप डाउनलाेड करणे आणि त्याचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमामुळे ग्राहकांचा वेळ आणि श्रम वाचण्यास मदत झाली. साेसायटीच्या परिसरातच सेवा उपलब्ध झाल्याने प्रलंबित कामे पूर्ण करणे अधिक साेयीचे झाले; तसेच माेबाइल अॅपच्या वापराबाबत मार्गदर्शन मिळाल्याने ग्राहकांना डिजिटल माध्यमातून महावितरणच्या विविध सेवा घेण्यासाठी प्राेत्साहन मिळाले. सुट्टीच्या दिवशीही साेसायट्यांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून ग्राहकांना सेवा देण्याच्या महावितरणच्या पुढाकाराबद्दल ग्राहकांनी समाधान व्य्नत केले.