काेल्हापूर सर्किट बेंचचा लवकरच विस्तार हाेणार

08 Jan 2026 23:21:12
 

HC 
 
मुंबई उच्च न्यायालयाच्या काेल्हापूर सर्किट बेंचचे प्रशासकीय न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यासह न्या. एस. जी.चपळगावकर व न्या. शिवकुमार दिगे यांची बदली झाली. यांच्या जागी प्रशासकीय न्यायमूर्ती एन. व्ही. सूर्यवंशी, न्या. आर.जी. अवचट आणि न्या. वृषाली जाेशी यांची नियुक्ती झाली. दरम्यान, लवकरच सर्किट बेंचमध्ये आणखी एक डिव्हिजन बेंच आणि दाेन सिंगल बेंच सुरू हाेणार आहेत.मुंबई उच्च न्यायालयातील एकूण 12 न्यायमूर्तींच्या प्रशासकीय बदल्या झाल्या आहेत. यात काेल्हापूर सर्किट बेंचमधील तीन न्यायमूर्तींचा समावेश आहे. न्या.कर्णिक आणि न्या. दिगे यांची मुंबई उच्च न्यायालयात बदली झाली. न्या.चपळगावकर यांची औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) खंडपीठात बदली झाली.
 
त्यांच्या जागी न्या. सूर्यवंशी, न्या. अवचट आणि न्या. वृषाली जाेशी यांची नियुक्ती झाली. न्या. अवचट आणि न्या.जाेशी यांनी यापूर्वी काेल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात प्रमुख न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे. हेच डिव्हिजन बेंचचे काम पाहणार आहेत.दरम्यान, सर्किट बेंचचा विस्तार हाेत असून, लवकरच आणखी एक डिव्हिजन आणि दाेन सिंगल बेंच सुरू हाेणार आहेत. तिन्ही काेर्टरूमचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या सुरू असलेल्या डिव्हिजन बेंचच्या बाजूच्या स्वतंत्र इमारतीत डिव्हिजन बेंच सुरू हाेईल, तर सहा मजली इमारतीत दाेन सिंगल बेंचचे कामकाज सुरू हाेईल. मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार लवकरच याचे उद्घाटन हाेणार आहे.
Powered By Sangraha 9.0