मतदान करण्यासाठी 15 जानेवारीस सुटी जाहीर

08 Jan 2026 23:34:36
 
 

Election 
राज्यातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खासगी आस्थापनांमधील सर्व कर्मचाऱ्यांना 15 जानेवारीस मतदानाच्या दिवशी मुंबई, ठाण्यासह राज्यातील 29 महापालिकांमध्ये भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.लाेकप्रतिनिधीत्व कायद्यानुसार मतदानाच्या दिवशी मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात सवलत देण्यात येते. मात्र, गेल्या काही निवडणुकांमध्ये काही संस्था, आस्थापना त्यांच्या कामगारांनमतदानाची भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत, असे आढळून आले आहे.त्यामुळे मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहावे लागते. हे लाेकशाहीसाठी अत्यंत घातक असल्याचे सांगत यंदाच्या महापालिका निवडणुकीसाठी मतदारांना भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश राज्य निवडणूक आयाेगाने राज्य सरकारला दिले हाेते.
 
त्यानुसार 15 जानेवारीस राज्यातील 29 महापालिकांमध्ये हाेणाऱ्या निवडणुकीत सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क याेग्यरीतीने बजावता यावा, यासाठी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उद्याेग आणिकामगार विभागाने याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. ही सुट्टी उद्याेग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, खासगी कंपन्यांतील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी, हाॅटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्याेगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शाॅपिंग सेंटर, माॅल्स, रिटेलर्स यांना लागू राहील.अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे माेठ्या प्रमाणावर नुकसान हाेईल अशा धाेकादायक अथवा लाेकाेपयाेगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात संबंधित अधिकारी, कर्मचारी व कामगारांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल, तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी दाेन ते तीन तासांची विशेष सवलत मिळेल.
Powered By Sangraha 9.0