उत्तर प्रदेशातील दाेडाखेडा नावाच्या गावात 24 वर्षीय राधा सिंग आणि 22 वर्षीय जिया सिंग यांनी फिनाईल पिऊन आत्महत्या केली. पदवी पूर्ण केल्यानंतर दाेन्ही बहिणी त्यांच्या कुटुंबासाेबत राहत हाेत्या. त्यांच्याकडे टाेनी नावाचा जर्मन शेफर्ड कुत्रा हाेता.त्यांचा भाऊ वीर सिंग याने सांगितले की, दाेन्ही बहिणी टाेनीवर खूप प्रेम करत हाेत्या. तथापि, टाेनी एक महिन्यापासून आजारी हाेता दाेघींनाही वाटत हाेते की टाेनी आता जगणार नाही. टाेनीला गमवावे लागेल या विचाराने त्या दाेघी खूप नैराश्यात गेल्या हाेत्या.टाेनीचा आजार अधिक गंभीर हाेत असताना, त्याला गमावण्याच्या भीतीने दाेन्ही बहिणींनी एकत्र फिनाईल पिले. यामध्ये एका बहिणीचा रुग्णालयात पाेहाेचताच मृत्यू झाला आणि दुसऱ्या बहिणीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.