मेंदूतील गडबडीमुळे ओसीडी हाेताे

08 Jan 2026 23:51:51
 
 

brain 
शंकांचे रुपांतर भीतीमध्ये : रात्रीचे 11 वाजले हाेते. कुलुप लावून अमित रूमकडे जाण्यासाठी निघाला.तित्नयात ताे परत वळला. कुलुप व्यवस्थित लागले आहे, आपण स्वतः ते चेक केले आहे, हे त्याला माहित हाेतं. पण, मनाच्या काेपऱ्यात पुन्हा शंका आली, जर याेग्यपद्धतीने बंद झाले नसेल तर? तीच शंका काही क्षणात भीतीमध्ये परिवर्तित झाली आणि अमित पुन्हा कुलुपाच्यासमाेर उभा राहिला.ही बाब केवळ कुलुपाची नाही. कुणी गॅसची बटणे पुन्हा पुन्हा तपासतात. कुणी खाण्यापूर्वी दहा वेळा हात धुतात. एखाद्याला भीती वाटते की, त्याने नकळतपणे कुणाचे तरी नुकसान केले आहे.
 
तर्कहीन शंका : हे कुणाला ओवर थिंकींग, खूप काळजी घेणे किंवा थट्टाही वाटू शकेल. पण, हीच आहे, ऑब्सेसिवकम्पल्सिव डिसऑर्डर (ओसीडी)ची लक्षणे.व्यक्तीला माहित असते की, भीती चुकीची आहे. तर्कहीन आहे. त्याला काेणतेच लाॅजिक सपाेर्ट नाही. पण, तरीही मन मानत नाही.यालाच तज्ज्ञ ‘डाउट-डिफे्नट’ असे म्हणतात.म्हणजेच मेंदुचे विश्वास ठेवण्याचे सर्कीट पुन्हा पुन्हा फेल हाेणे.
 
मेंदूतील एरर-डिटे्नशन सिस्टम अधिक सक्रीय : तज्ज्ञ सांगतात की, ओसीडीमध्ये मेंदुतील एरर-डिटे्नशन सिस्टम गरजेपेक्षा जास्त सक्रीय हाेते. साधी शंकाही मेंदुला माेठी समस्या वाटू लागते. जसे की धूर नसतानाही फायर अलार्म वाजायला लागताे.
 
मेंदूच्या सिग्नलिंग सिस्टममध्ये गडबड : त्यामुळेच आता ओसीडीला आता सवय किंवा कमजाेरी मानले जात नाही. तर एक न्यूराेसाइकेट्रिक कंडीशन मानले जाते.
जिथे मेंदूचा सिग्नलिंग सिस्टममध्ये गडबड निर्माण हाेते.
 
मेंदूला रिले्नस करण्यात यशस्वी हाेत आहेत उपचार : नवीन संशाेधनात स्पष्ट झाले आहे की, ओसीडीमध्ये मेंदुच्या दाेन फ्रंटाे-स्ट्रायटल सर्किटमध्ये असंतुलन निर्माण हाेते. एक सर्किट धाे्नयाला वाढवून दाखवते.तर दुसरे त्याला शांत करू शकत नाही.ब्रेन-स्कॅनमध्ये एरर-डिटे्नशन नेटवर्क गरजेपेक्षा जास्त सक्रिय दिसते. त्यामुळे छाेटीशी शंकादेखील माेठा धाेका वाटू लागते.
 
सीबीटी, ईआरपी थेरेपी प्रभावशाली : येल यूनिवर्सिटीच्या अभ्यासात संशाेधनक ब्रायन जाबाेस्की यांनी सांगितले की, ओसीडीमध्ये मेंदुचे पॅटर्न ओळखणारे डीप- लर्निग माॅडल 80 टक्के पर्यंत अचूकता दाखवत आहे, ही चांगली गाेष्ट आहे.आता सीबीटी आणि ईआरपी सारख्या थेरेपी प्रभावशाली वाटू लागल्या आहेत.हे उपचार मेंदुला नवीन विश्वास शिकवत आहेत. शंका निर्माण करणारे विचार हळूहळू शांत हाेऊ लागतात.
Powered By Sangraha 9.0