वाॅकिंग मीटिंग ऑफिसकामात उत्तम आउटपुट देतात

06 Jan 2026 23:48:26
 
 

meeting 
स्टीव्हप्रमाणेच इतर काही यशस्वी लीडर्सनाही चालत मुद्दे डिस्कस करणे आवडत असे. अनेक अध्ययनातून दिसून आले आहे की, एका जागी बसून हाेणाऱ्या ऑफिस मीटिंग्जमध्ये लाेक बाेअर तर हाेतातच शिवाय त्या मीटिंग प्राॅड्निटव्हही नसतात. यामुळेच गुगल, फेसबुकसह जगातील माेठ्या कंपन्या मीटिंग करण्याच्या आपल्या पद्धती बदलत आहेत.
 
क्रिएटिव्ह थिंकिंगसाठी मिळते मदत : फेसबुक फाउंडर मार्क झुकरबर्ग नेहमी आपल्या भावी कर्मचाऱ्यांना जंगलात वाॅकवर नेण्यासाठी प्रसिद्ध आहे. गूगल सीईओ सुंदर पिचाईही वाॅक करीत आपली थिंकिंग प्राेसेस उत्तम बनवतात. सुंदर यांच्या मते त्यांना वेग पसंत आहे आणि क्रिएटिव्हपणे विचार करण्यासाठी वाॅक त्यांना खूपच मदत करताे.सायंटिफिक पद्धतीने उपयुक्त : मूव्हिंग मीटिंग्ज फक्त एक नवी फॅशन नसून एक शास्त्रीय पद्धतही आहे.ज्यामुळे नवे विचार वेगाने उत्पन्न करता येऊ शकतात.स्टॅनफाेर्ड विद्यापीठाच्या अध्ययनानुसार वाॅक करणे क्रिएटिव्ह थिंकिंग 60 टक्के वाढवते. यासाठी रिसर्चर्सनी 176 काॅलेज स्टूडंट्सना प्रथम एकाजागी बसून काही काम पूर्ण करण्यास सांगितले आणि नंतर तेच काम त्यांना वाॅक करीत करायला सांगितले. या प्रयाेगानंतर ते स्टूडंट वाॅक करताना खूप क्रिएटिव्ह आढळले.
 
नव्या लर्निंगसाठी तयार हाेताे मेंदू : जर आपला जांब आपल्याला दिवसभर डेस्कलाच बांधून ठेवत असेल तर वाॅकिंग काही नवा विचार करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. वाॅकिंगने मेंदूच्या लर्निंग व मेमरीसंबंधित भागांपर्यंत रक्तप्रवाहास वेग येत असताे.ज्यामुळे विचाराची व समजण्याची क्षमता वाढते. एका अध्ययनानुसार फक्त 12 मिनिटांचे वाॅकिंग आपला अटेंटिव्हनेस वाढवू शकताे व मूडही उत्तम बनवताे.ल्निंडइन सीईओ जेफ वीनर म्हणतात, वाॅक करीत मीटिंग करणे फक्त फिटनेससाठीच फायद्याचे नसून आपण अधिक फाेकस्डही राहू शकता. व्हर्जिन ग्रुपचे संस्थापक रिचर्ड ब्रेनसनही जेफ वीनर यांच्या मताशी सहमत आहेत. कित्येकदा वाॅक करीत ते स्वत:ला चॅलेंज देत असतात. रिचर्ड म्हणतात, हा बिझनेस करण्याचा क्विक प्रकार आहे. फक्त वाॅक करीत प्लॅन करा आणि चटकन निर्णय घेऊन डील पक्की करा.
Powered By Sangraha 9.0