वायाेस्वरूपें विचरती । वायाेमध्ये जगज्जाेती ।।1।।

31 Jan 2026 14:42:59
saint 
 
पूर्वी निर्माण झालेल्या शंकांच्या निरसनाची सुरुवात श्रीसमर्थांनी तिसऱ्या ‘देहआशंकाशाेधन’ समासापासून केली आहे. पंचमहाभूतांमधील आकाश हे सर्वांत श्रेष्ठ व परब्रह्माला अतिशय जवळचे महाभूत आहे.
 
अनेकदा म्हणूनच आकाश हेच ब्रह्म मानले जाण्याची श्नयता असते. ब्रह्माची विशालता व अखंडता त्याला असली तरी त्याला मर्यादा आहे व त्याचे अस्तित्व जाणवणारे, दिसणारे आहे म्हणून ते ब्रह्म नव्हे हे सत्य आहे. आकाशावरून ब्रह्माची कल्पना करता येईल. ज्याला मर्यादा व वेगळेपणाचे आभासात्मक स्वरूप नाही असे आकाश म्हणजेच परब्रह्म हाेय असे सूत्ररूपाने सांगता येईल. दृश्य विश्वाची निर्माती मूळमाया काेठून आली या प्रश्नाला श्रीसमर्थ या पहिल्याच ओळीत उत्तर देताना म्हणतात की, निराभास ब्रह्मामध्येच मूळमाया जन्माला आली. श्नतीचे प्रतीक म्हणून पंचमहाभूतांपैकी वायूला म्हटले जाते. ही मूळमाया श्नतीरूप असल्याने ती वायूस्वरूप आहे. या श्नतीमध्येच पांचही महाभूते आणि सत्त्व, रज आणि तम हे त्रिगुणही वास करतात. या मूळमायेपासून पंचमहाभूते आणि त्रिगुणांच्या संयाेगाने गुणमाया निर्माण झाली आणि गुणमायेपासून सकल विश्व आकारास आले असा सिद्धांत आहे. जगामध्ये देवाची विविध रूपे आहेत. कात्यायनी, चामुंडा, जाखिणी अशा अनेक स्त्रीदेवता, राम, विष्णू, श्रीकृष्ण अशा पुरुष देवता आहेत. मात्र, ती सर्व वायूस्वरूपच आहेत. त्या देवतांचे गुप्त हाेणे, प्रगट हाेणे, नाना रूपे धारण करणे, असे चमत्कार श्नतीस्वरूप वायूचेच आहेत.
Powered By Sangraha 9.0