मुंबई, 30 जानेवारी (आ.प्र.) : मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयाेजित शाेकसभेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सेवाकाळात नेहमी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्यभावनेने कर्तव्य पार पाडले. त्यांच्या निधनाने राज्य शासनाने कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि व्नतशीर नेतृत्व गमावले आहे, अशी भावना अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी व्य्नत केली.
या प्रसंगी मंत्रालयातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी डाॅ. इक्बालसिंह चहल, मनीषा म्हैसकर, अश्विनी भिडे, असिमकुमार गुप्ता, विकासचंद्र रस्ताेगी, वेणुगाेपाल रेड्डी, अनुपकुमार सिंग, राधिका रस्ताेगी, एकनाथ डवले, साैरभ विजय, डाॅ. हर्षदीप कांबळे, अतुल पाटणे, संजय खंदारे, एस.
चाे्नकलिंगम, रणजितसिंह देओल, वीरेंद्र सिंह, गणेश पाटील, संताेष कुमार, दिलीप घुमरे, जयश्री भाेज, अंशू सिन्हा, राजेश गवांदे, विजय वाघमारे, मकरंद देशमुख यांच्यासह उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.