वर्क लाईफ बॅलन्सवर जुन्या-नव्या पिढीत संघष

31 Jan 2026 13:22:06
 

Conflict between old and new generations
 
संध्यानंद.काॅम मानवी इतिहासात प्रत्येक पिढीला असे वाटते की, त्यांची जगण्याची पद्धत हीच सर्वाे त्तम आहे. बेबी बूमर्स (1946-1964) पिढीने कडक शिस्त, ऑफिसप्रति निष्ठा आणि पहाटे उठून कामाला सुरुवात करणे, हे सर्वाेच्च गुण मानले. आजची ‘जेन न’ (1997-2012) ही पिढी बंडखाेरी करत असल्यासारखे वाटते, परंतु प्रत्यक्षात ते केवळ जगण्याची पद्धत नव्याने लिहीत आहेत. थकव्यापेक्षा विश्रांतीला आणि दिखाव्यापेक्षा वास्तववादाला अधिक महत्त्व देत आहेत. आधीच्या पिढ्यांनी जपलेल्या अशा काही सवयी आहेत, ज्या आजच्या आधुनिक मानसिकतेला पूर्णपणे विसंगत वाटतात.
 
शाैर्याचा चुकीचा मार्ग : जुन्या पिढ्यांमधील लाेक ‘मी कधीही आजाराचीही रजा घेतली नाही,’ या गाेष्टीचा अभिमान बाळगत असत, जणू काही आजारपणातही कामावर हजर राहणे हे एखाद्या शाैर्याचे लक्षण आहे. कादंबरीतील पात्राप्रमाणे खाेकत असतानाही ऑफिसला जाणे हे त्यांच्यासाठी निष्ठेचे लक्षण हाेते.
 
‘माझे आजी-आजाेबा अभिमानाने सांगतात की, त्यांनी आजारी असतानाही काम केले, कारण त्यांना ‘वर्क-लाइफ बॅलन्स’ (काम आणि वैयक्तिक आयुष्यातील संतुलन) ही संकल्पनाच माहीत नव्हती,’ असे अनिशा पटेल ही जेन न तरुणी सांगते. मात्र, आजची पिढी या संस्कृतीकडे (सतत काम करणे) एका वेगळ्या नजरेने पाहते. काेराेनाच्या जागतिक महामारीनंतर, आजारपणात कामावर येणे हे आता निष्ठा नाही, तर धाेकादायक मानले जाते.
 
जर तुम्ही आजारी असताना कार्यालयात जाता, तर तुम्ही केवळ स्वतःवर अन्याय करत नाही, तर तुमच्या सहकाऱ्यांच्या आराेग्याशीही खेळता. आजच्या काळात स्वतःसाठी वेळ घेणे किंवा विश्रांतीसाठी सुट्टी घेणे हा आळशीपणा नसून, ताे स्वतःचा आणि इतरांचा सन्मान करणे आहे. शेवटी, जर तुम्ही विषाणू पसरवत असाल, तर त्या कष्टाला काय अर्थ आहे? घरात शाेभेसाठी असलेली महागडी भांडी : जर तुमचे बालपण बूमर्स कुटुंबात गेले असेल, तर तुम्हाला घरातल्या विशिष्ट कपाटाची आठवण नक्कीच असेल, जे अत्यंत चिनी मातीच्या भांड्यांनी भरलेले असायचे. ते संच खास पाहुण्यांसाठी राखून ठेवलेले असायचे, जे पाहुणे वर्षानुवर्षे कधीच आले नाहीत. परिणामी, ती महागडी आणि सुंदर भांडी कपाटात केवळ धूळखात पडली. आजच्या तरुण पिढीने हा तर्क पूर्णपणे माेडीत काढला आहे. त्यांच्यासाठी आयुष्य हाच एक खास साेहळा आहे. एखाद्या भविष्यातील आनंदासाठी सध्याचा आनंद राखून ठेवण्याची कल्पना त्यांना कालबाह्य वाटते. नव्या नियमानुसार, तुम्ही स्वतःच ती खास व्यक्ती आहात आणि तुम्हाला आनंद देणाऱ्या गाेष्टी वापरण्यासाठी वाट पाहण्याची गरज नाही.
 
पदवी म्हणजे आता यशाची खात्री नाही : ‘जुन्या काळातील पिढ्यांसाठी यशाचा एक ठरलेला मार्ग हाेता - चांगली पदवी मिळवा, स्थिर सरकारी किंवा काॅर्पाेरेट नाेकरी मिळवा आणि निवृत्तीपर्यंत तिथेच टिकून राहा. शिक्षण हे त्यांच्यासाठी पात्रतेचे आणि कर्तृत्वाचे अंतिम प्रमाणपत्र हाेते. पण आजचे जग लवचिकता आणि काैशल्यांवर चालते, केवळ फ्रेम केलेल्या पदव्यांवर नाही,’ असे प्रिया शहा म्हणते.
 
इंटरनेट आणि ऑनलाइन प्लॅटफाॅर्म (उदा.काेर्सेरा, युडेमी, यूट्यूब) मुळे शिकणे, आता शाळेपुरते न राहता, ती आयुष्यभर चालणारी प्रक्रिया बनली आहे. जेन न (1981-1996) आणि मिलेनिअल्सना आता पदवीपेक्षा स्वतः चा अभ्यास अधिक महत्त्वाचा वाटताे. एखाद्या विशिष्ट काैशल्यात प्राविण्य मिळवणे किंवा स्वतः चा ब्रँड उभा करणे हे वर्गाबाहेरही घडू शकते.
 
अवाजवी शारीरिक टिप्पणी : आधीच्या पिढ्यांमधले लाेक अनेकदा चांगल्या हेतूने बाेलतात, जसे की, ‘अरे, तुझे वजन वाढले आहे!’ किंवा ‘तू खूप बारीक दिसताेयस!’ पण तरुण पिढीसाठी अशा टिप्पण्या केवळ अस्वस्थ करणाऱ्या नसून, त्या खासगी आयुष्यात केलेली ढवळाढवळ वाटतात.
 
काेणाच्याही शारीरिक आकार वा दिसण्यावर भाष्य करणे आता कालबाह्य, आक्षेपार्ह मानले जाते. आजची पिढी ‘बाॅडी पाॅझिटिव्हिटी’ (शरीराविषयक सकारात्मकता) आणि मानसिक आराेग्य जनजागृतीच्या वातावरणात वाढली आहे. त्यांना व्यक्तीच्या दिसण्यापेक्षा तिच्या ऊर्जे चे, कर्तृत्वाचे किंवा व्यक्तिमत्त्वाचे काैतुक केलेले अधिक आवडते. ‘तू खूप आनंदी दिसताेयस!’ किंवा ‘तुझ्याशी बाेलून छान वाटले!’ अशा वाक्यांमुळे संवादाची खऱ्या अर्थाने सुरुवात हाेते.
 
नेहमीच घाई, कधीच निवांत नाही : बूमर्ससाठी वेळ पाळणे हे एक सातत्याने पाळायचे व्रत हाेते. ‘एक मिनीट उशिरा जाण्यापेक्षा तीन तास आधी पाेहाेचणे’ या तत्त्वावर ते जगतात. ‘जेव्हा आम्हाला 5 वाजताची ट्रेन पकडायची असते, तेव्हा माझे आजाेबा आम्हाला दुपारी 2 वाजताच घरून बाहेर पडायला लावतात, जरी स्टेशन केवळ 30 मिनिटांच्या अंतरावर असले तरीही,’ असे नंदिता अडसूळ हसून सांगते.
 
 जेन न प्रवाशांना ही भीती आणि तासन्तास स्टेशनवर बसून राहणे पूर्णपणे अनावश्यक वाटते. त्यांना घाई करण्यापेक्षा शांत राहणे आवडते. आधुनिक तंत्रज्ञान आणि रिअल-टाइम ट्रॅकिंगमुळे त्यांना माहीत असते की ते किती वेळात पाेहाेचू शकतात. त्यामुळे शेवटच्या क्षणी व्यवस्थित पाेहाेचणे त्यांना अधिक फायद्याचे आणि शांततापूर्ण वाटते.

स्वतःच्या घराचे स्वप्न : नव्या पिढीसाठी स्वतःचे घर खरेदी करणे हे यशाचे अंतिम शिखर आणि सुरक्षिततेचा शिक्का हाेता. पण आजच्या पिढीसाठी घराच्या वाढत्या किमती, शैक्षणिक कर्जे आणि अस्थिर नाेकऱ्यांमुळे घराचे स्वप्न आवाक्याबाहेर गेले आहे किंवा ते आता तितकेसे महत्त्वाचे राहिलेले नाही. त्यांना 30 वर्षे कर्जाच्या ओझ्याखाली राहण्यापेक्षा स्वातंत्र्य, वेगवेगळ्या शहरात काम करणे अधिक आवडते. त्यांच्यासाठी यश म्हणजे बँक बॅलन्स किंवा मालमत्ता नसून, ते आनंद आणि मनाची शांती आहे. बारकाईने पाहिल्यास दाेन्ही पिढ्यांपैकी काेणाचेच विचार चुकीचे नाहीत. आधीच्या पिढ्या आज बचत करून उद्याचा काळ सुरक्षित करायची, तर आजची पिढी वर्तमानातल्या जगण्याला महत्त्व देते. आपल्या पालकांना त्यांच्या सवयींसाठी आपण दाेष देत असलाे तरी, त्यामागे काळजी व सुरक्षितता हाेती. सर्व स्तराच्या पिढ्यांकडून चांगल्या गाेष्टी स्वीकारत, सर्वांर्नाच आनंदाने राहणे, फायदेशीर आहे.
 
Powered By Sangraha 9.0