फाॅलिक अ‍ॅसिड म्हणजे काय? त्याचे फायदे काय?

    30-Jan-2026
Total Views |
 
Folic Acid
 
सामान्यत: शरीराला फाॅलिक अ‍ॅसिडची पूर्तता बऱ्याच पदार्थांमधून हाेते पण काही विशेष स्थिती मध्ये शरीराला मिळणारी याची मात्रा कमी हाेत गेली तर हळूहळू विविध आजार शरीराला विळखा घालून बसतात. चला तर सगळ्यात पहिलं हे जाणून घेऊया कि हे फाॅलिक अ‍ॅसिड काेणकाेणत्या पदार्थांमध्ये सापडतं.
 
फाॅलिक अ‍ॅसिड म्हणजेच जीवनसत्त्व ‘ब’ हाेय. फाॅलिक अ‍ॅसिड अर्थात जीवनसत्त्व ‘ब’ हे मुख्यत: खारट चवीची फळे आणि पालेभाज्यांमध्ये आढळते. जर आपण याचे मुख्य स्त्राेत पहिले तर ते पालक, ब्राेकली, कडधान्ये, शेंगदाणे, सुर्यफुलाच्या बिया, सी फूड, अंडी, मटार आणि सीट्रस फुले हे आहेत. यांमध्ये सर्वाधिक प्रमाणात फाॅलिक अ‍ॅसिड आढळते आणि हे सगळे पदार्थ सहज उपलब्ध सुद्धा हाेतात आता जाणून घेऊया कि हे फाॅलिक अ‍ॅसिड तुम्हाला काेणत्या समस्यांपासून वाचवतं.

फाॅलिक अ‍ॅसिड हे केसगळती वर खूप गुणकारी आहे. गळत्या केसांना राेखण्याचं महत्त्वपूर्ण कार्य फाॅलिक अ‍ॅसिड करतं. काही लाेकांना त्यांच्या चुकीच्या खाण्या पिण्यामुळे फाॅलिक अ‍ॅसिडची पर्याप्त मात्रा मिळत नाही आणि त्याचे परिणाम त्यांना भाेगावे लागतात केस गळतीच्या समस्ये मधून! जर तुम्हालाही वाटतं की तुमचे केस गळू नयेत वा तुमचे केस गळत असतील आणि ती केसगळती राेखायची असले तर नक्कीच फाॅलिक अ‍ॅसिड असलेल्या पदार्थाचे सेवन तुम्ही करायला हवे.

फाॅलिक अ‍ॅसिडची सर्वात जास्त गरज असते ती गराेदर स्त्रियांना! नॅशनल सेंटर फाॅर बायाे टेक्नाेलाॅजी इन्फाेर्मेशनच्या अनुसार फाॅलिक अ‍ॅसिड गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या विकासासाठी आणि त्याच्या मेंदूच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. म्हणून गराेदर स्त्रियांनी वर सांगितलेल्या फाॅलिक अ‍ॅसिडचे प्रमाण अधिक असलेल्या खाद्य पदार्थांचे याेग्य प्रमाणात सेवन करायला हवे. पण हाे आपल्या मर्जीनुसार हे खाद्य पदार्थ खाऊ नयेत. सेवन करण्यापूर्वी एकदा आपल्या डाॅक्टरांचा सल्ला आवर्जुन घ्यावा.

कित्येक लाेक वेगवेगळ्या समस्यांमुळे सतत ताण तणावाखाली असतात. अशा लाेकांना या ताणतणावापासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर त्यांच्यासाठी फाॅलिक अ‍ॅसिड हे वरदान आहे.

तुम्ही सुद्धा घरगुती समस्या किंवा ऑफिसच्या टेन्शन मुळे ताणतणावात असता तर फाॅलिक अ‍ॅसिडअधिक असलेल्या खाद्य पदार्थांचे शक्य तितके सेवन करा. जेव्हा तुमच्या शरीरातील फाॅलिक अ‍ॅसिडची मात्रा वाढत जाईल तेव्हा आपसूकच तुमच्या मनावरील ताण तणावाचे प्रमाण सुद्धा कमी हाेत जाईल. तर मंडळी असे आहे हे फाॅलिक अ‍ॅसिड आणि असे आहेत त्याचे फायदे. इतर काेणत्याही पाेषक तत्वापेक्षा फाॅलिक अ‍ॅसिड हे यासर्व कारणामुळेच महत्त्वाचे आहे. हे जर शरीरात नसेल तर तुमचे शरीर हे आजार आणि व्याधींचे घर बनून जाईल. म्हणून याससाठी स्वत:चा बचाव करायचा असले तर न चुकता फाॅलिक अ‍ॅसिड असणाऱ्या खाद्य पदार्थांचा आहारात समावेश करावा. हि गाेष्ट इतरांना सुद्धा सांगा आणि त्यांनाही निराेगी राहण्यासाठी मदत करा.