गावात प्रवेश करण्याआधी एक बाेर्ड आहे, त्यावर लिहिलेले आहे की, चप्पल-बूट काढून ठेवा. खरेतर असे यासाठी आहे की, इथले ग्रामस्थ या गावाला मंदिर मानतात...
भारत अतिशय सुंदर आणि विचित्र, अजब परंपरांनी भरलेला देश आहे. इथे अनेक अनाेखी गावे आहेत. आज आपण वेल्लागवी नावाच्या एका अनाेख्या गावाविषयी माहिती पाहू. इथले लाेक चप्पल-बूट वापरत नाहीत. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य निश्चित वाटले असेल. पण गावाच्या या परंपरेच्या मागील कारण मनाेरंजक आहे.
वेल्लागवी गाव तमिळनाडूतील एका जंगलात वसलेले लहानसे गाव आहे. या गावात सुमारे 100 कुटुंबे राहतात.
रंजक बाब ही आहे की, या गावात काेणताही रस्ता नाही.
त्यामुळे इथे पाेहाेचण्यासाठी एका अवघड ट्रेकची आवश्यकता असते. तुम्ही हे पाहून आश्चर्यचकीत व्हाल की, इथे घरांपेक्षा जास्त मंदिरे आहेत. या सुंदर गावाविषयी आणि आणि इथे राहणाऱ्या लाेकांच्या या अजब परंपरे विषयी जाणून घेऊया.
इथले लाेक चप्पल-बूट वापरत नाहीत जर तुम्ही या 300 वर्षे जुन्या गावाची यात्रा करण्याची तयारी करत असाल, तर अनवाणी पायांनी गावात फिरण्यासाठी तयार राहा. कारण इथे राहण्याची हीच पद्धत आहे. गावात प्रवेश करण्याआधी एक बाेर्ड आहे, त्यावर लिहिलेले आहे की, चप्पल-बूट काढून ठेवा. खरेतर असे यासाठी आहे की, इथले ग्रामस्थ या गावाला मंदिर मानतात. देवतांसाठीचा त्यांचा सन्मान त्यांना त्यांच्या आरामापेक्षा जास्त महत्त्वाचा वाटताे. मूळ रूपात या गावांत देवता आणि भ्नत एकत्र राहतात. म्हणूनच काेणालाही चप्पला घालून या गावात प्रवेश करण्याची परवानगी नाहीये. वेल्लागावी गावातील लाेक शेकडाे वर्षांपासून या ‘नाे फुटवेअर’ नियमाचे पालन करत आहेत.
घरांपेक्षा जास्त मंदिरे आहेत इथे या गावात प्रवेश करताना तुम्ही पाहाल की, इथे 25 पेक्षा जास्त मंदिरे घरांच्या मधाेमध आणि गावाच्या शेवटपर्यंत बांधलेली आहेत. खेदाची गाेष्ट अशी आहे की, इथे काेणता रस्ता नाही, काेणते हाॅस्पिटल नाही आणि शाळाही नाहीये. इथे केवळ एक चहा आणि आवश्यक गरजा मिळणारे दुकान आहे.
लवकर झाेपी जाते पूर्ण गाव ही गाेष्ट मनाेरंजक आणि आश्चर्यकारक आहे की, संपूर्ण गाव 7 वाजता झाेपी जाते. त्यानंतर तिथे माेठ्या आवाजात बाेलणे आणि म्युझिक ऐकण्याची अनुमतीही नाहीये. इतके कडक नियम आणि अडचणींनंतर इथले लाेक आनंदी राहतात.
गावकरी जेवणासाठी बाेलवितात वेल्लागवी सांगायला तर खूप लहान गाव आहे. तिथे सुखसुविधा सुद्धा खूप कमी आहेत. पण जर तुम्ही तिथे गेलात, तर तिथले लाेक तुम्हाला उपाशी राहू देणार नाहीत. ते तुम्हाला जेवण्यासाठी आमंत्रित जरूर करतील. त्याशिवाय गावात एक कॅफे आहे. तिथे तुम्हाला सर्व प्रकारची मदत मिळू शकेल. जर तुम्ही वेल्लागवी गावात राहण्याची याेजना आखत असाल तर, टेंट हाच एकमेव पर्याय आहे.
ट्रेकर्ससाठी स्वर्ग आहे हे गाव आपल्या अजब परंपरेनंतरही हे ठिकाण प्रत्येक ट्रेकरचे स्वप्न आहे. अनुभवी ट्रेकर्ससाठी हे गाव एखाद्या स्वर्गापेक्षाही कमी नाही. ही जागा त्या लाेकांसाठी एकदम याेग्य आहे, जे एकांताच्या शाेधात असतात.