राम ठेवील जी स्थिति। त्यात समाधान राखे ज्याची वृत्ति। त्या नाव खरी विरक्ति।। रामाआड जें जें काही। तेथून दूर ठेवी वृत्ति। या नांव विवेकाची प्राप्ति।। वृत्ति न हाेऊं द्यावी विषयीं ार। चित्तीं चिंतावा रघुवीर।। जेव्हां वृत्ति हाेते विषयाकार। तेथें न राहे सारासार विचार।। त्राता राम जाणून चितीं। निर्भय करावी आपली वृत्ती।। वृत्ति राही अभिमानाला धरून। तेथें न राही कधीं अनुसंधान।। जें जें पाहावें तें तें रामच हाेईजे। ऐसी ठेवावी वृत्ती।। रघुनंदन आणावा चित्तीं ।। काळाेख अत्यंत मातला। घालवावयास उपाय दुजा न सुचला। हाेता सूर्याचें आगमन। काळाेख जाईल स्वत: आपण।। तैसे ‘राम कर्ता’हा भाव ठेवतां चित्तीं।। उपाधीरहित (बनते वृत्ति।। वृत्ति आवी शुद्ध, संतसज्जनांना प्रमाण। त्याने संतुष्ट हाेईल नारायण।। जग) स्वार्थमूलक खरें। हें आपले वृत्तीवरूनच ओळखणें बरें।। अलग करावी सर्वांहून। आलेली ऊर्मि करावी सहन। सर्व कर्ता जाणून रघुनंदन।। नि:संशय करावी वृत्ति आपण। सद्गुरूस जावें शरण। संशयविरहित वृत्तीने घ्यावे नाम। जें सुखाचें आहे धाम।। शुद्ध ज्याचें अंत:करण।
शुद्ध ज्याचें आचरण। परमात्म्याबद्दल शुद्ध ज्याची वृत्ति। त्याच्याहून दूर न राहे रघुपति।। सर्व कांहीं करावें आपण। पण वृत्तीनें त्यांत न गुंतावें आपण।। नामांत ठेवावें प्रेम। तेथें प्रकटेल पुरुषाेत्तम।। देहाचें चलन ज्याचे सत्तेनें। त्या रघुपतीचें स्मरण असावे आनंदाने।। प्रपंचांत धरिता नामाची संगति। काळजीविरहित आनंद देई।। वासना नामापायीं पडली। धन्य धन्य सज्जनीं मानिली।। पाणी माती एक झाले। वेगळे नाहीं करतां आले। निवळी घालावी पाण्यांत। पाणी स्वच्छ हाेतें जाण।। तैसा विषयांत राहून जगतीं। नामाची ठेवावी संगती।। विषयाचें विष शाेषून घेई। ऐसी आहे नामाची प्रचीति।। शक्य तितकें राहावें नामांत। याहून दुसरे न आणावे मनांत।। परा पश्यंती वैखरी वाणी। याच्याही पलीकडे नाम ठेवा स्मरणीं।। नामापरती उठेल वृत्ति। तेथें सावध असावें तुम्हीं।। जाे नामांत राहिला दंग। त्याने लुटला रामरंग।। रामनाम बाेलावें वाचा। काह न येऊं द्यावा काळजीचा।। नामाविण राम। जैसें पाकळ्यांविण ूल जाण।। नाम ज्यानें घेतलें सर्वकाळ। जिंकला त्याने एक अंतकाळ।। भगवंत ठेवील त्यांत हित मानावें। अखंड नामस्मरण घ्यावे।। नामांत स्वत:चा विसर। हेंच देईल रघुवीर।। भगवंताची प्राप्ति, संतांची संगति, नामाचे प्रेम,। हें भगवत्कृतेवांचून नाहीं साधत जाण।। सतत करावें नामस्मरण। सर्व इच्छा राम करील पूर्ण।।