सार्वजनिक जीवनात संवाद झाला कमी; वाद-आरडा ओरडा वाढला

30 Jan 2026 17:56:06
 
Slider2
 
संध्यानंद.काॅम अमेरिकेच्या ड्यूक युनिव्हर्सिटीने केलेल्या एका पाहणीनंतर असा निष्कर्ष निघाला, की समाज आता अशा स्थितीत पाेहचला आहे, जिथे लाेक एकमेकांना समजून घेण्यासाठी एकमेकांशी संवाद साधत नाहीत, तर आपली ओळख, विचारधारेचे रक्षण करण्याचे हत्यार म्हणून संवादाकडे पाहिले जात आहे.
 
निर्माण केलीय वादविवाद संस्कृती पाहणीनुसार, साेशल मीडिया, टीव्ही डिबेटमध्ये सात दिवस/चाेवीस तास वादविवाद संस्कृतीने लाेकांना रिअ‍ॅ्निटव बनवले आहे. प्रत्येक मुद्द्यावर तातडीने मत देणे जरूरी झाले आहे. मग, पूर्ण गाेष्ट समजलेली असाे की नाही.
 
इतरांच्या मताला मानू लागले धाेका आता एखाद्या गाेष्टीवर असहमती दाखवणे हा बाैद्धिक अभ्यास राहिला नाही, तर भावनिक भांडणाची सुरुवात बनत आहे.

लाेक वेगळ्या मताला आव्हान नव्हे तर धाेकादायक म्हणून पाहू लागले आहेत. या वृत्तीचा परिणाम केवळ राजकारणापुरता राहिला नाही. ऑफिसमध्ये मीटिंगही आता एकांगी हाेऊ लागल्याचे दिसते. कारण, प्रश्न विचारणे हे आता शिकण्याची इच्छा मानली जात नाही, तर त्याला विराेध म्हणून समजण्यात येऊ लागले आहे. 
 
ऐकून घेण्याची इच्छा झाली कमी घरांमध्येही बाेलणे हाेते तेव्हाही प्रत्येकजण स्वतःचे म्हणणे मांडून पुढे जाऊ लागला आहे. दुसऱ्याला ऐकून घेण्यासाठी आवश्यक असलेली मनाची शांती गायब हाेत आहे. ड्यूक युनिव्हर्सिटीतील समाजशास्त्राचे प्राेफेसर क्रिस बेल यांनी सांगितले की, आजकाल लाेक संवाद सुरू करण्यापूर्वीच ठरवून टाकतात की त्यांना काय सिद्ध करायचे आहे. आता लाेक ऐकण्यासाठी नव्हे तर उत्तर देण्यासाठी बाेलण्यात भाग घेतात. त्यामुळेच संवाद पुढे जात नाही.

सन्मानजनक असहमती गरजेची मानसशास्त्राचे प्राध्यापक एशली जार्डिना यांनी सांगितले की, लाेकशाही केवळ भांडणाने नाही तर सन्मानजनक असहमती आणि धैर्याने ऐकण्यामुळे मजबूत हाेते. सध्याची सगळ्यात माेठी गरज नवीन भांडणाची नाही तर ऐकण्याची कला पुन्हा एकदा शिकण्याची आहे. कारण, जेव्हा ऐकणे संपते, तेव्हा केवळ संवाद तुटत नाही तर समाजाचा विवेकही संपताे.
समाेरच्याला ऐकून घेण्याचे प्रशिक्षण द्यावे लागेल तज्ज्ञांचा सल्ला आहे की, याचे उत्तर केवळ मीडिया सुधारणे किंवा साेशल प्लॅटफाॅर्मवर नियंत्रण ठेवणे नाही.

शाळा, कार्यालय, सार्वजनिक संस्थांमध्ये ऐकण्याचे ट्रेनिंग आणि संवादावर आधारित चर्चांना प्राेत्साहन दिले पाहिजे.
त्यामुळे एखाद्या गाेष्टीवर असहमती आहे म्हणजे भांडण नव्हे तर शिकण्याची प्रक्रिया बनविण्यात येईल.

सामाजिक जीवन संपण्याची भीती ड्यूक युनिव्हर्सिटीचे डायलाॅग अक्राॅस डिफरेंस रिसर्चशी संबंधित ए्नसपर्ट्स सांगतात की, हे संकट लाेकशाहीच्या आधी सामाजिक जीवनाला संपवत आहे. लाेक जेव्हा एकमेकांना ऐकायचे साेडून देतात, तेव्हा विश्वास तुटताे.
परस्पर विश्वासाशिवाय काेणताही समाज दीर्घकाळपर्यंत टिकू शकत नाही. जर संवाद हा अशाच प्रकारे केवळ प्रदर्शन आणि जिंकण्याची शर्यत बनत राहिला तर, सार्वजनिक चर्चा या केवळ गाेंधळ बनून जातील. 
 
 
Powered By Sangraha 9.0