इतरांची मदत करणे ही केवळ नैतिक जबाबदारी नाही, तर स्वतःला आनंदी आणि मानसिकदृष्ट्या मजबूत ठेवण्याचीही पद्धत आहे. जर्मनीच्या मॅनहेन विश्वविद्यालयाने केलेल्या नवीन संशाेधनात ही गाेष्ट स्पष्ट झाली आहे.जे लाेक इतरांप्रति दया, सहानुभुती दाखवतात, ते आपल्या आयुष्यात जास्त संतुष्ट, भावनात्मकदृष्ट्या समाधानी असतात. हे अध्ययन सायंटिफिक रिपाेर्ट जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. यासाठी जर्मनीच्या विद्यापीठाने चाळीसपेक्षा अधिक शाेधनिबंधांचे विश्लेषण केले.जीवनाची गुणवत्ताही वाढते करुणेमुळे सामाजिक नातेसंबंध मजबूत हाेतातच.
त्याचबराेबर मानसिक स्वास्थ्य आणि जीवनाची गुणवत्ताही वाढते. जे लाेक इतरांचा त्रास समजू शकतात, त्यांना मदत करू इच्छितात आणि भावनिक आधार देतात, ते लाेकआपल्या आयुष्यात जास्त संतुष्ट हाेतात.जास्त आनंदी राहतात. जीवनात अर्थ आणि उद्देश असल्याचे त्यांना जाणवते.मानसिकदृष्ट्या जास्त सुदृढ असतात.दयेचा प्रत्येक व्यक्तीवर समान परिणाम संशाेधकांनी सांगितले की, दया केल्यामुळे तणावही कमी हाेताे. पण, त्याचा परिणाम थाेडा कमी झालेला दिसताे. तरीही दयाळू लाेकांमध्ये तणाव, उदासी कमी असते, हे दिसून आले आहे. असे लाेक जास्त ऊर्जावान, सकारात्मक विचारांचे असतात. संशाेधकांनी सांगितले की, दया करणे हे फार अवघड काम नाही.
वेदनेला समजणे हा उद्देश: संशाेधकांनी सांगितले की, दयेचा अर्थ इतरांची समस्या समजणे असा असताे. ही समस्या मनापासून जाणवणे आणि त्या वेदनेला कमी करण्यासाठी काही तरी करण्याचा प्रयत्न असताे. दया आणि आनंद हे वय, लिंग, धर्मानुसार वेगवेगळे नसतात. हा प्रत्येक व्यक्तीचा अनुभव एकसमान असताे.
दयाभावना शिकता येते: ज्या लाेकांमध्ये दयाभावना नाही, ते ही भावना शिकूही शकतात. ध्यान, कार्यक्रम, सामाजिक बांधिलकी, डिजिटल ट्रेनिंगने दया वाढवता येऊ शकते. त्यामुळे स्वतःचा आनंदही वाढेल.