एका कविेतेत सांगितले गेले आहे की, ‘जेव्हा सारे संपून जाईल, तेव्हाही प्रेम जिवंत राहील.’ गाैतम बुद्धही म्हणाले हाेते की, ‘तुम्हा स्वत:लाही प्रेम व स्नेह करण्याचा तेवढाच हक्क आहे जेवढा या ब्रह्मांडात इतर काेणाला आहे.’ वास्तवता ही आहे की, माणसाकडे स्वत:वर प्रेम करण्यास वेळच नाही. याउलट अनेक संशाेधकांनी व मानसशास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले आहे की, एक ठाम व्यक्तिमत्व तेव्हाच हाेऊ शकते जेव्हा सर्वप्रथम माणूस स्वत:वर प्रेम करायला शिकेल. अर्थात व्यक्ती आपले गुण, आपले काैशल्य, आपली हुशारी व आपल मनाची अशी सजावट करील की त्यात प्रत्येक गाेष्टीसाठी जागा असावी. व्यक्तिमत्व ठाम असेल तरच माणूस चांगल्या-वाईट गाेष्टींमधून चांगल्याची निवड करू शकेल. याउलट लवचिक व्यक्तिमत्त्वाचा माणूस गर्दीत हरवलेला एक चेहरा बनून राहील.
असे कामचलावू व्यक्तिमत्त्व आजच्या काळात काणाला आवडेल? त्यामुळे गरज ही आहे की, माणसाने सर्वप्रथम स्वत:वर प्रेम करायला शिकावे.जीवनावर प्रेम करा मानवी शरीर प्रभूची सर्वश्रेष्ठ कृती असल्याचे सांगितले गेले आहे. ते सुदृढ व निराेगी ठेवणे प्रत्येक माणसाचे प्रथम कर्तव्य व धर्म आहे.हे तेव्हाच श्नय हाेईल जेव्हा ताे स्वत:वर प्रेम करील. वेळेवर झाेपणे व वेळेवर उठणे वयक्तीची शारीरिक, मानसिक व आर्थिक स्थिती सुदृढ बनवते. वयानुसार नियमित याेग, व्यायाम, ध्यान करा. यामुळे आपण तणाव, चिंता, निराशा यापासून दूर राहाल. सकाळचे फिरणे काेणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही. यामुहे आपल्याला नवी आत्मशक्ती मिळते. ज्यामुळे दिवसभर आपण उत्साहाने व जाेमाने भरून जाताे.आनंदी राहा, आनंद वाटा आपली प्रसन्नता आपल्याला उत्साही ठेवील व इतर लाेकांनाही आपली साथ आवडेल.
प्रसन्न व्यक्ती समाजासाठी काही करू शकण्याच्या स्थितीत राहताे. देवाने आपल्याला पृथ्वीवर काही चांगले काम करण्यासाठी पाठवले आहे. हास्य वाटणे त्यापैकीच एक आहे. काेणतीही गाेष्ट वाटल्याने कधीही संपत नसते.ती वाढत असते, असे भारतीय शास्त्रांमध्ये सांगिततले गेले आहे. हसून आपण फक्त आनंदच देत नसताे तर एखाद्याचे दु:खही काही काळासाठी कमी करू शकताे.पाॅझिटिव्ह राहा स्वामी रामतीर्थ यांनी सांगितले आहे की, माणूस स्वत:च स्वत:चा भाग्यविधाता आहे. अर्थ स्पष्ट आहे की कर्मशील माणसाच्या हाती सारे काही आहे. त्याचे विचार त्याला चांगल्या-वाईट मुक्कामापर्यंत पाेहाेचवतात. ताे स्वत: आपल्या कर्मांनी आपले भाग्य लिहिताे. दुसरे काेणी नाही.जर ताे नेहमी चुकीचा विचार करीत असेल तर त्याचे मन नकारात्मक विचारांनी भरलेले राहील.जे त्याला यशापासून अनेक काेस दूर फेकील.नकारातमक विचार हळू हळू पूर्णपणे आपल्यावर कुरघाेडी करतात व आपले जीवनाविषयीचे प्रेम नाहीसे हाेते.
अशा वेळीस्वत:वर विश्वास ठेवा की आपण प्रत्येक काेणतेही काम करू शकता.आपण जगात उगाचच आलेला नाही. त्या परमपित्याने आपल्याला एखाद्या हेतूनेच या पृथ्वीवर पाठवले आहे. त्यामुळे आपण वेळीच स्वत:ला सांभाळावे व जीव मुक्तपणे जगावे.कारण आपले जीवन खूप अनमाेल आहे.स्वत:वर असावा अतूट विश्वास आपण कधी स्वत:वर विश्वास केला आहे? एकदा स्वत:वर विश्वास ठेवू पहा. बऱ्याचदा पाहिले गेले आहे की, कधी कधी एखादी व्यक्ती असे काम करते की ज्याची त्याने कल्पनाही केलेली नसते. तेव्हा ताे खराेखरच ते काम त्यानेच केले आहे. याच्यावर त्याचा विश्वासच बसत नाही. जगातील प्रत्येक काम जरी ते कितीही कठिण का असेना माणसाच्या हातून झाले आहे. आज आपण जे काही करीत आहाेत जेवढ्या ताकदीने करीत आहाेत त्यापेक्षा कराेडाे पट अधिक ताकद आपल्याकडे आहे. त्यामुळे स्वत:चे महत्त्व समजा.