जिल्हाधिकारी येडगे यांची ‘दिलखुलास’मध्ये मुलाखत

29 Jan 2026 21:42:42
 

DM 
 
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त काेल्हापूर जिल्ह्यात मतदार जनजागृतीसाठी राबवण्यात आलेले विविध उपक्रम; तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीबाबतकाेल्हापूरचे जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांची विशेष मुलाखत प्रसारित हाेणार आहे.ही मुलाखत गुरुवारी (29 जानेवारी) सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या राज्यातील सर्व केंद्रांवर प्रसारित हाेणार असून, न्यूज ऑन एआयआर या माेबाइल अ‍ॅपवरूनही ऐकता येईल. काेल्हापूर विभागीय माहिती कार्यालयातील सहायक संचालक वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.देशभरात राष्ट्रीय मतदार दिवस माेठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर काेल्हापूर जिल्ह्यात मतदार नाेंदणी, मतदानाचा ह्नक आणि लाेकशाहीतील नागरिकांची भूमिका याबाबत जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात आले.
 
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम, नवमतदार नाेंदणी; तसेच घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांबाबत त्यांनी माहिती दिली आहे. 5 फेब्रुवारीस हाेणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेली तयारी, मतदान प्रक्रिया, निवडणुकीदरम्यान माध्यमांचा वापर करताना उमेदवारांनी घ्यावयाची खबरदारी, प्रचार प्रसारासाठी परवानगी देण्यासाठीची व्यवस्था, आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी, मतदारांसाठी सुविधा; तसेच शांततापूर्ण, पारदर्शक व निर्भय वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी केलेल्या उपाययाेजनांवरही त्यांनी या मुलाखतीतून प्रकाश टाकला आहे.लाेकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी येडगे यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0