मंत्रालयात राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ

26 Jan 2026 16:18:00
 
 
 

voter 
देशभर राष्ट्रीय मतदार दिन 25 जानेवारीस साजरा केला जाताे. या वर्षी राष्ट्रीय मतदार दिन रविवारी (25 जानेवारी) आहे. 23 जानेवारीस मंत्रालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कार्यक्रम आयाेजिण्यात आला. या प्रसंगी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता यांनी उपस्थितांना मतदार दिनाची शपथ दिली. केंद्रीय निवडणूक आयाेगाची स्थापना 25 जानेवारी 1950 राेजी झाली. केंद्रीय निवडणूक आयाेगामार्फत देशात निष्पक्ष व पारदर्शकरित्या निवडणुकांचे संचालन करण्यात येते. 2011 पासून आयाेगाकडून दरवर्षी 25 जानेवारीस राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जात आहे.मंत्रालयात मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव मकरंद देशमुख, सह-मुख्य निवडणूक अधिकारी मनाेहर पारकर यांच्यासह अधिकारी- कर्मचारी उपस्थित हाेते.
Powered By Sangraha 9.0