नांदेडमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वरांत दुमदुमली गुरबानी; साेहळा उत्साहात

26 Jan 2026 16:19:31
 

Nanded 
 
हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षाचे औचित्य साधून पवित्र तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब येथे भव्य आणि विशेष कीर्तन समागमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या साेहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे 350 शालेय विद्यार्थ्यांनी एका सुरात केलेल्या श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या शब्द गुरबानीच्या गायनाने उपस्थितीतांना मंत्रमुग्ध केले.पवित्र तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब, नांदेड बाेर्डाद्वारे आयाेजित हा कार्यक्रम संपन्न झाला. श्री गुरु तेग बहादूर साहिबजींना 350 विद्यार्थ्यांनी ही अनाेखी स्वरांजली अर्पण केली. गुरुद्वाराचे जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंघजी, बाेर्डाचे प्रशासक डाॅ. विजय सतबीर सिंग, समागम समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, जसवंत सिंग बाॅबी, गुरुद्वारा बाेर्डाचे अधीक्षक हरजितसिंघजी कडेवाले आदी उपस्थित हाेते.विद्यार्थ्यांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या गुरबानीच्या पवित्र स्वरांनी संपूर्ण वातावरण भ्नितमय झाले हाेते. या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक साेहळ्याचे साक्षीदार हाेण्यासाठी भाविक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. मुलांच्या या शिस्तबद्ध आणि भावपूर्ण सादरीकरणाचे मान्यवरांनी काैतुक केले.
Powered By Sangraha 9.0