प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानीतील कर्तव्यपथावर हाेणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ सज्ज झाला आहे.यंदा गणेशाेत्सव : आत्मनिर्भरतेचे प्रतीक या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला जाणार आहे.राष्ट्रीय गीत वंदे मातरमला 150 वर्षे पूर्ण हाेत असल्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर यंदाचा साेहळा विशेष ठरणार आहे. युराेपियन काैन्सिलचे अध्यक्ष अँटाेनियाे काेस्टा आणि युराेपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वाॅन डेर लेयन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत संचलनात सहभागी हाेणारा महाराष्ट्राचा हा चित्ररथ राज्याची प्रदीर्घ परंपरा आणि वाढत्या आर्थिक सामर्थ्याचे दर्शन जगाला घडवेल.
लाेकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशाेत्सवातून ज्या सामाजिक क्रांतीचीमुहूर्तमेढ राेवली, तीच चळवळ आज आधुनिक भारताला कशी आत्मनिर्भर बनवत आहे, याचे प्रभावी चित्रण या चित्ररथात केले आहे.
गणेशाेत्सवाच्या माध्यमातून हाेणारी काेट्यवधींची आर्थिक उलाढाल, कलाकारांना मिळणारा राेजगार आणि त्यातून विणली गेलेली आर्थिक साखळी या चित्ररथाच्या केंद्रस्थानी आहे. राज्य शासनाने 2025 पासून गणेशाेत्सव हा राज्य महाेत्सव म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली असून, या उत्सवामुळे केवळसांस्कृतिकच नव्हे, तर पर्यावरणीय आणि आर्थिक आत्मनिर्भरतेसही कशी चालना मिळते, हे या चित्ररथातून ठळकपणे मांडण्यात आले आहे.या चित्ररथाच्या अग्रभागी राज्याच्या ऊर्जेचे प्रतीक असलेला भव्य ढाेल आणि ताे वाजवणारी पारंपरिक वेशभूषेतील महिला राज्याच्या प्रबळ स्त्रीश्नतीचे दर्शन घडवेल. चित्ररथाच्या मध्य भागात गणपतीची देखणी मूर्ती साकारणारा मूर्तिकार आणि विसर्जनासाठी निघालेला गणेशभ्नत दर्शवण्यात आला आहे.चित्ररथाच्या शेवटच्या भागात राज्याचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायक मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली असून, इतर सांस्कृतिक बाबींचेही दर्शन घडवण्यात आले आहे. चित्ररथाच्या दाेन्ही बाजूस पारंपरिक नऊवारी साडी परिधान केलेल्या महिलांचे लेझीम पथक असेल.