दही रात्री खाणे याेग्य की अयाेग्य?

26 Jan 2026 16:29:39
 
 

Health 
 
ज्यांना आर्थरायटिस (संधिवात) आहे अशा रुग्णांनीही रात्री दही टाळावे.ज्यांना दमा (अस्थमा), ब्राॅन्कायटिस, सायनुसायटिस किंवा काेणत्याही प्रकारच्या शवसनविषयक समस्या आहेत, त्यांनी रात्री दही खाऊ नये. दही कफ वाढवते आणि त्यामुळे श्वास घेण्याचा त्रास वाढू शकताे.ज्यांना गॅस, आम्ल्पित्ताचा त्रास आहे, त्यांनी याेग्य वेळी (सकाळी किंवा दुपारी) दही न खाल्ले तर फायदा हाेताे. पण, अयाेग्य वेळी (रात्री) दही खाल्ले, तर त्याच लाेकांना त्याचा त्रास हाेऊ शकताे.व्यक्ती तीच, अन्न तेच; पण वेळ बदलली की परिणामही बदलताे.ज्या मुलांना सहज सर्दी-खाेकला हाेताे, जी मुले वारंवार आजारी पडतात, त्यांना रात्री दही देऊ नये. ज्यांची प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) आधीच कमजाेर आहे, अशा लाेकांनीही रात्री दही खाणे टाळावे.
 
रात्री दही खायचेच असेल तर काय करावे? नियमांनुसार पाहिले तर तुम्ही दही सकाळी खाल्ले तर ठीकच! मात्र जर रात्री खायचेच असेल तर त्यात काही फेरफार करून ते खाऊ शकता.हे समजावताना न्यूट्रिशनिस्ट, डाॅ. याेगिता गाेर्डिया सांगतात, ‘पाकशास्त्रात असा विचार केला जाताे की, एखादा खाद्यपदार्थ कसा खाल्ल्यास ताे शरीराला अपाय ना करता पचेल. प्रत्येक पदार्थ अपायकारकनसताे. त्याची वेळ, प्रमाण आणि पद्धत महत्त्वाची असते.दही घ्यायचेच असेल तर काय करावे? दह्याऐवजी ताक बनवून प्या, ताकात भाजलेले जिरे किंवा सुंठ घालावी.खिचडी-कढी एक उत्तम आणि हलके जेवण आहे. कढीमध्ये जरी दही आणि तेही आंबट दही वापरले असेल तरी त्यात जेव्हा जिरे, हिंग, माेहरी, कढीपत्त्याची पाने यांची फाेडणी दिली जाते, तेव्हा कढी काेणत्याही प्रकारे नुकसान करत नाही.
 
पूर्वीच्या काळी लाेक फाेडणीयुक्त ताक (वधार लेले छास )घेत असत. जर दही खायचेच असेल तर ते फाेडणी देऊन (वधार) खाण्याचा पर्याय वापरावा. दुसरं हे लक्षात ठेवा की फ्रीजमधले थंड दही टाळावे, कारण ते शरीराला त्रासदायक ठरू शकते.बाकी जे लाेक वर्षानुवर्षे रात्री दही खात आहेत, त्यांना बहुतांशी काही त्रास हाेत नाही. कारण प्रत्येक शरीर वेगळे असते. जर तुम्हाला दही खाल्ल्यानंतर त्रास हाेत नसेल तर चिंता करण्याचे कारण काही.पण, जर ते अनुकूल वाटत नसेल किंवा अपायकारक वाटत असेल तर सवय नक्की बदला. अनेकदा सवय बदलल्यावर अधिक हलके आणि आराेग्यदायी वाटू लागते.
Powered By Sangraha 9.0