लेफ्टनंट कर्नल सीता शेळके यांना आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार जाहीर

26 Jan 2026 16:21:24
 
 
 
DM
 
आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात शाैर्य आणि तांत्रिक काैशल्याचा सुयाेग्य वापर करणाऱ्या अहिल्यानगरच्या सुकन्या लेफ्टनंट कर्नल सीता शेळके यांना केंद्राचा सुभाषचंद्र बाेस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 जाहीर झाला आहे.नेताजी सुभाषचंद्र बाेस यांच्या जयंतीचे औचित्य साधून (पराक्रम दिवस) केंद्राने ही घाेषणा केली. देशभरातून 271 नामांकनांतून ले. क.शेळके यांची वैय्नितक श्रेणीसाठी निवड झाली आहे. सीता शेळके यांनी 2024 मध्ये केरळमधील वायनाडमध्ये झालेल्या भीषण भूस्खलनादरम्यान बजावलेली कामगिरी या पुरस्कारासाठी निर्णायक ठरली. वायनाडमध्ये निसर्गाचे थैमान सुरू हाेते, तेव्हा त्यांनी अत्यंत प्रतिकूल हवामानात शेकडाे नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी बचाव माेहिमेचे नेतृत्व केले.
Powered By Sangraha 9.0