भुसावळमध्ये वंदे भारतच्या मेंटेनन्स कामाबाबत नियाेजन

    22-Jan-2026
Total Views |
 

vande 
 
नागपूर-पुणे दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या फेऱ्यांची संख्या भविष्यात वाढू शकते. त्यामुळे या गाड्यांची देखभाल भुसावळमध्येही हाेईल.त्या दृष्टीने नियाेजन सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांनी दिली.गुप्ता यांनी मनमाड-भुसावळ रेल्वे विभागाचा दाैरा केला. या प्रसंगी मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल तसेच मुख्यालय आणि भुसावळ विभागातील प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते. रेल्वेच्या परिचालन व्यवस्थेची कार्यक्षमता, सुरक्षा निकषांची अंमलबजावणी; तसेचजिल्ह्यात प्रगतिपथावर असलेल्या विविध विकासकामांची पाहणी करून आढावा घेतला. स्थानिक आमदार व इतर लाेकप्रतिनिधींशी संवाद साधत विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा केली.त्यांनी पिंपरखेड येथील ट्रॅक्शन सब- स्टेशनचे निरीक्षण केले.
 
ट्रान्सफाॅर्मरची पाहणी करून देखभाल पद्धतींचा आढावा घेतला. हिरापूर येथे गँग युनिट क्रमांक पाच, टर्नआऊट क्रमांक 102 बी; तसेच हरापूर यार्डमधील लाँग वेल्डेड रेल्स व स्वीच एक्स्पान्शन जाॅइंट्सची तपासणी केली. यावेळी गुप्ता यांनी ट्रॅकमन हँडबुक आणि टूल बाॅक्स टाॅक या पुस्तिकांचे प्रकाशन केले. चाळीसगाव वाघळी विभागातील क्राॅसिंग गेटची तपासणी केली.पाचाेऱ्यातही गुप्ता यांनी स्थानक परिसर, उपस्थानक व्यवस्थापकांचे कार्यालय, रेल्वे आराेग्य केंद्र, रेल्वे वसाहत, तसेच इलेक्ट्राॅनिक इंटरलाॅकिंग प्रणालीचे निरीक्षण केले. यानंतर त्यांनी संकेत सहायक या पुस्तिकेचे प्रकाशन केले. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.गुप्ता यांनी भुसावळमध्ये रूटीन ओव्हर आईलिंग शेड आणि ओएचई डेपाेची तपासणी केली. तसेच भुसावळ येथील नवीन अधिकारी विश्रामगृहाचे उद्घाटन केले.