महाराष्ट्राच्या तसेच भारतीय क्रीडा विश्वात नवा इतिहास घडवणारी ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली.देशातील ही पहिलीच आंतरराष्टीय ग्रँड टूर सायकल स्पर्धा असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील आपल्या व्यग्र कार्यक्रमातून वेळ काढून स्पर्धेचे थेट प्रक्षेपण पाहिले.बजाज पुणे ग्रँड टूरला जागतिक स्तरावर टूर डी फ्रान्ससारख्या स्पर्धांना असलेली प्रतिष्ठा मिळाली आहे.मुख्यमंत्र्यांनी दावाेसमधून जगभरातील सायकलपटूंचे स्वागत केले हाेते.राज्याच्या क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी त्यांनी साेबत असलेल्या अधिकाऱ्यांच्या लॅपटाॅपवर स्पर्धेतील थरार अनुभवला.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार हाेत असताना त्यांनी सायकलपटूंच्या काैशल्याचेही काैतुक केले. मुख्यमंत्री येथे वर्ल्ड इकाॅनाॅमिक फाेरमसाठी आले आहेत. दिवसभराच्या व्यग्र कार्यक्रमात दाेन्ही देशांतील वेळांचा फरक लक्षात घेऊन त्यांनी स्पर्धेच्यावेळी थेट प्रक्षेपण पाहण्याची इच्छा व्य्नत केली.मुख्यमंत्री सचिवालयाच्या अपर मुख्य सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव डाॅ. श्रीकर परदेशी, उद्याेग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बलगन, विकास आयु्नत दीपेंद्रसिंह कुशवाह, महाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारसू यांनीही थेट प्रक्षेपण पाहताना स्पर्धेचा आनंद घेतला.